Ghee Vs Butter : तूप की बटर? कोणतं आरोग्यासाठी सर्वाधिक फायदेशीर? तज्ज्ञ म्हणतात की...
Ghee Vs Butter : प्रत्येक घरात तूप आणि बटर हे दोन्ही पदार्थ असतात. काही पदार्थ हे तूपाच बनवलं जातात. तर काही पदार्थ बटरमध्ये बनवल्यास त्याला अप्रतिम चव येते. पण आपल्या आरोग्यासाठी तूप की बटर कोणतं सर्वाधिक फायदेशीर आहे, याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या.
Difference between ghee and butter : तूप हे आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे असं सांगण्यात येतं. त्यामुळे भारतीय घरांमध्ये तूप अन्न पदार्थांमध्ये वापरलं जातं. गेल्या काही वर्षांमध्ये बटरचाही वापर केला जातो. गरमागरम वरणभातावर तूप, तर गरमा गरम पराठ्यावर बटर लावून आपण खातो. स्वयंपाक करताना महिला काही पदार्थांसाठी तूप तर काहींसाठी बटर वापरते. अनेकांना असं वाटतं की, तूप आणि बटर एकच आहे. पण या दोघांमध्ये फरक आहे. शिवाय तूप किंवा बटर आपल्या आरोग्यासाठी काय सर्वाधिक फायदेशीर जाणून घेऊयात. (Ghee or butter which is more beneficial for health Experts say)
तूप आणि बटरमधील फरक काय?
तूप आणि बटर या दोघांमध्ये फार फरक नाही. या दोघांमधील फरक म्हणजे तूप बनवण्यासाठी दह्यापासून लोणी काढलं जातं. ते लोणी वितळवून त्यापासून तूप तयार होतो. तर चवीबद्दल बोलायचं झालं तर तुपाची चव खमंग आणि बटरची चव आंबट असतं.
तुपाचे फायदे
देसी तूप खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात असं तज्ज्ञ सांगतात. पचनसंस्थेशाठी तूप खूप चांगल असतं. शिवाय बद्धकोष्ठतेची समस्या असल्यांना तज्ज्ञ तूप खाण्याचा सल्ला देतात. तुपात दाहक-विरोधी गुणधर्म असल्याने ते रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास फायदेशीर ठरतं. आयुर्वेदानुसार देसी तुपाचे सेवन त्वचेसाठी आणि केसांसाठी खूप फायदेशीर मानले जाते. देसी तुपात अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे आणि खनिजे असल्याने ते आपल्या शरीरासटी फायदेशीर आहे.
बटरचे फायदे
आरोग्यासाठी बटरचे फायदे देखील अगणित आहे, असं तज्ज्ञ म्हणतात. बटरमध्ये व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात असल्याने शरीरात कॅल्शियम शोषण्यास ते फायदेशीर ठरते. कॅल्शियमयुक्त बटरचं सेवन केल्यास हाड मजबूत होतात. उन्हाळ्यात बटर खाणे अधिक फायदा होतो.
तूप बटर
कॅलरीज: 120 kcal कॅलरीज: 102 kcal
फॅट्स: 14 ग्रॅम फॅट्स: 11.5 ग्रॅम
सॅच्युरेटेड फॅट्स : 10 ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट्स: 7 ग्रॅम
मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स: 3.5 ग्रॅम मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स: 3 ग्रॅम
पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स: 0.5 ग्रॅम पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स: 0.4 ग्रॅम
कोलेस्ट्रॉल: 36 मिग्रॅ कोलेस्ट्रॉल: 31 मिग्रॅ
तूप की बटर कोणतं आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर?
आहार तज्ज्ञ आणि डॉक्टर सांगतात की, तूप आणि बटरमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स अधिक असल्याने त हृदयविकारासाठी चांगल नाही. अशात या दोन्हीचं सेवन योग्य प्रमाणात केल्यास याचा आपल्या शरीराला फायदा होतो. शिवाय गवत खाणाऱ्या गायचं तूप वापरावं असं तज्ज्ञ सांगतात.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)