मुंबई : तुम्ही जर कोणत्या कामात अपयशी ठरत असाल तर झोप या मागचं एक कारण असू शकतं. तुम्ही जर वेळेवर झोपत नसाल आणि पूर्ण झोप घेत नसाल तर याचे अनेक दुष्परिणाम तुमच्यावर होतात. जाणून घ्या का वेळेवर झोपलं पाहिजे.


१. तुमची काळजी कमी होणार


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लक्षात ठेवा जेव्हा आई तुम्हाला सांगते की सकाळी सर्व ठीक होईल? तेव्हा ती बरोबर असते ! जे उशिरा झोपतात त्यांच्यामध्ये नकारात्मकता जास्त येते. जेव्हा या बाबत अभ्यास केला गेला तेव्हा त्याच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की झोपेच्या व्यत्ययामुळे निराशावादी विचार येतात.  मानसशास्त्रज्ञांनी असे सुचविले आहे की चांगल्या झोपण्याच्या सवयींवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. तुम्ही झोपले नाही तर ती समस्या सूटणार असं नाही आहे. त्यामुळे योग्य झोप घेतली पाहिजे. काळजी न करता पूर्ण झोप घेतली तर त्यामुळे ती समस्या व्यवस्थित सोडवता देखील येऊ शकते.


2. तुम्ही इतरांपेक्षा चांगले मिळवू शकता.


अलीकडे बर्याच युक्तिवादांमध्ये असं समोर आलं आहे की, कमी झोप घेतल्यामुळे चिडचिड होणे, यवकर राग येणे आणि तणावग्रस्त होणे अशा समस्या उद्भवतात. दुसरीकडे योग्य आराम केल्याने आपल्याला नैसर्गिकरित्या अधिक आशावादी, धैर्य आणि फ्रेश वाटते.  आपल्या जवळ कितीही नकारात्म गोष्टी घडत असल्या तरी आपण ती सोडवू शकता.


3. सुरक्षित प्रवास करू शकता.


झोप कमी होणं यापेक्षा भंयकर गोष्ट अजून कोणती असू शकत नाही. कारण झोप कमी असणं आणि गाडी चालवणं फार धोक्याचं ठरतं.  यामुळेच अपघात होण्याची शक्यता दुप्पटीने वाढते. जवळपास 60 टक्के चालकांनी म्हटलं की, झोप पूर्ण न झाल्यामुळे त्यांच्या गाडीला अपघात झाला. ७ ते ८ तास झोपणाऱ्या व्यक्तींपेक्षा ६ तास झोपणाऱ्या चालकांचे अपघात दुप्पटीने होतात. जर तुम्ही ५ तासापेक्षा कमी झोप घेत आहात तर अपघातची शक्यता पाच पट्टीने वाढते. २४ तासात तुम्ही झोप काढली नसेल तर तुम्ही नशेत असलेल्या व्यक्तीप्रमाणे गाडी चालवत आहात.


4. कामावर अधिक कार्यक्षम व्हाल


रात्र-रात्र जागून अहवाल तयार करत असाल तर त्याचा काहीही उपयोग नाही. कारण जेव्हा तुम्ही तो सादर कराल तेव्हा अपुऱ्या झोपेमुळे तुम्हाला तो चांगल्याप्रकारे सादर करता येणार नाही. अपुऱ्या झोपेमुळे तुम्ही अनेक गोष्टी विसरुन जाता. मेंदुला कार्यक्षम ठेवणे अशावेळी कठिण होऊन जाते. 


५. हिवाळ्यात आजारी न पडणारे बनाल


योग प्रकारे हात न धुणे आणि पुरेशी झोप न घेणे यामुळे सर्दी आणि तापची समस्या हिवाळ्यात उद्भवते.  योग्य वेळी शौचालयाला जाणे यामुळे रोगप्रतिकार शक्ती चांगली राहते. आपण आजारी पडल्यास त्याचा परिणाम इतर सहकाऱ्यांवर देखील होतो. तुम्ही शिंकता तर त्यांना देखील त्रास होतो. त्यामुळे हिवाळ्यात आजारी पडणार नाही याची काळजी घ्या.


६. तुम्ही आणखी चांगले दिसणार


जेव्हा आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही, तेव्हा आपण इतके चांगले दिसत नाही. जेव्हा तुम्ही योग्य झोप घेता तेव्हा मात्र तुमच्या चेहऱ्यावर वेगळं तेज असतं. अपुरी झोप घेणारे लोकं कमी आकर्षक, कमी निरोगी आणि आत्मविश्वास कमी झालेले दिसतात. तुम्ही जेव्हा झोपता तेव्हा शरीर थकलेल्या जुन्या पेशींना ताजेतवाने करण्यासाठी कार्य करते आणि आपण अधिक चमकदार दिसण्यात मदत करते.