नवी दिल्ली : सध्याची आपली जीवनशैली इतकी व्यस्त आणि गुंतागुंतीची आहे की ज्यामध्ये आपल्याकडे वेळ सोडून सर्व काही आहे. पण आपल्याकडे चॅटींग करायला, गाणी ऐकायला, शॉपिंग करायला, मित्रांसोबत सिनेमा पाहायला वेळ आहे. पण व्यायामासाठी वेळ नाही. यामुळेच आपण कमी वयात आजारांना बळी पडतो. मात्र आपण जर फक्त तीन मिनीटे जरी स्वतःसाठी खर्च करु शकलो तरी नक्कीच आजारांपासून दूर राहण्यास मदत होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कामाच्या स्वरूपामुळे आपली जीवनशैली बदलली आहे. बैठ्या जीवनशैलीचे दुष्परिणाम आपण भोगतोच आहोत. त्यात ९-१० तास ऑफिसमध्ये काम केल्यावर २ तास प्रवास आणि मग घरी आल्यावर काही त्राणच राहीलेले नसतात. त्यात घरातले काही काम असेल तर मग काहीच वेळ शिल्लक राहत नाही.



हे सर्व जरी असले तरी आपले आरोग्य महत्त्वाचे आहे. आणि ते जपण्यासाठी व्यायामाची नितांत आवश्यकता आहे. त्यासाठी ऑफिस आणि घरी अगदी सहज करत्या येण्यासारखे आहेत. पाहुया नेमके काय करायचे तेः


  • घरी किंवा ऑफिसमध्ये लिफ्ट ऐवजी जिन्यांचा वापर करा. त्यामुळे शरीर अॅक्टीव्ह होईल.

  • ऑफिसमध्ये थोड्या वेळाने उठून फिरा. फोनवर बोलताना खुर्चीवर बसून न बोलता चालत बोला.

  • कंप्म्युटरसमोरून उठा आणि बाहेर एक फेरी मारून या.

  • एकाच वेळी खूप खाऊ नका. थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने थोडे थोडे खा.

  • आहारात फळांचा समावेश करा. हंगामी फळे खाणे फायद्याचे ठरेल.

  • चहा घेण्यासाठी ऑफिसबाहेर पडा. खुर्चीवर बसून चहा घेऊ नका.

  • खुर्चीवर बसून शक्य ते व्यायामप्रकार करा. 

  • डोळ्यांवर थंड पाण्याचे हबके मारा. 

  • मान-पाठ उजवीकडे डावीकडे वळवा.

  • कंबरेच्या मागे दोन्ही हात नेऊन तुम्ही तुमचा थकवा दूर करू शकता.