मुंबई : संपूर्ण देशाला कोरोनाचा धोका आहे. कोरोनाची दुसरी लाट आता कुठेतरी ओसरताना दिसतेय. दरम्यान कोरोनाचा प्रभाव कमी व्हावा यासाठी लसीकरण मोहिमेला सुरुवात करण्यात आली. तर आता लसीकरणादरम्यान अजून एक चांगली बातमी समोर आली आहे. इंडियन मेडिकल रिसर्च काउंसिलच्या नव्या अभ्यासानुसार असं समोर आलंय की, कोरोना प्रतिबंधक लसींचं मिक्सिंग आणि मॅचिंगचे चांगले रिझल्ट समोर आलेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीएमआरच्या नव्या स्टडीमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, कोविड लसीचे मिश्रण आणि मॅचिंगचे परिणाम चांगले परिणाम समोर आले आहेत. अभ्यासात असं म्हटलं आहे की, कोवॅक्सिन आणि कोविशिल्डच्या मिश्रित डोसांचे चांगले परिणाम दर्शवले आहेत. मध्यंतरी असे अनेक अहवाल होते, ज्यात असे समोर आलं होतं की, लोकांना लसीकरणादरम्यान कोवॅक्सिनचा एक डोस आणि कोविशिल्डचा दुसरा डोस मिळाला होता.


मिक्स डोसचे परिणाम अधिक चांगले


एएनआयच्या ट्विटनुसार, आयसीएमआरने म्हटलं आहे की, कोविशील्ड आणि कोवॅक्सिनच्या मिश्रित डोसचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. ICMR च्या ताज्या अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, दोन्ही लसींचे मिश्रित डोस अधिक प्रभावी असू शकतात. अॅडेनोव्हायरस वेक्टर प्लॅटफॉर्म-आधारित लसीच्या कॉम्बिनेशनह लस केवळ सुरक्षित असल्याचं आढळले नाही, तर त्यात चांगले इम्युनोजेनिसिटी असल्याचं दिसून आलं आहे.


DCGIने मिक्स डोसांच्या अभ्यासाची शिफारस केली होती


गेल्या महिन्यात ड्रग कंट्रोलर ऑफ इंडियाने एका तज्ज्ञांचं पॅनेल तयार करून कोविशील्ड आणि कोवॅक्सिनच्या मिश्रित डोसवर अभ्यास करण्याची शिफारस केली. वेल्लोरमधील ख्रिश्चन मेडिकल कॉलेजने अशा अभ्यासासाठी परवानगी मागितल्यानंतर ही शिफारस समोर आली.