रात्री शांत झोप लागत नाहीये; हे पदार्थ नक्की खा!
अनेकांना रात्रीच्या वेळेस पूर्ण झोप लागत नाही.
मुंबई : आजकाल अनेकांना रात्रीच्या वेळेस पूर्ण झोप लागत नाही. तर काहींना झोप लागली तरी रात्री अचानक जाग येते. जर तुम्हीही रात्री झोप न येण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. वैद्यकीय तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, दिवसातून 8 तासांपेक्षा कमी झोपल्याने तुमच्या शारीरिक कार्यावर गंभीर परिणाम होतो. आपल्या शरीराला विश्रांतीसाठी आणि दिवसाच्या कामातून बरे होण्यासाठी कमीतकमी 8 तासांची झोप आवश्यक असते.
आहार तज्ज्ञ डॉ रंजना सिंह म्हणतात की, तुम्ही निद्रानाशावर घरगुती उपाय करून पाहू शकता. असं बरेच पदार्थ आहेत जे आपण आपल्या आहारात समाविष्ट करू शकता आणि ज्यामुळे तुम्हाला चांगली झोप लागू शकते.
बदामाचं सेवन
दुधाप्रमाणेच बदामांमध्येही ट्रिप्टोफॅन असते, ज्याचा मेंदू आणि मज्जातंतूंवर चांगला परिणाम होतो. हेच कारण आहे की बदाम देखील चांगली झोप देण्यास मदत करू शकतात. त्याच वेळी, त्यात असलेले मॅग्नेशियम आपल्या हृदयाचं आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करतं.
डार्क चॉकलेट
बदामाव्यतिरिक्त डार्क चॉकलेट हे उत्तम झोपेसाठीच्या पदार्थांपैकी एक आहे. यात सेरोटोनिन देखील असतं, जे आपल्या मनावर शांत प्रभाव पाडण्यास मदत करते. यामुळे चांगली झोप लागायला मदत करते.
गरम दूध
चांगल्या झोपेसाठी एक ग्लास कोमट दूध हे उत्तम पर्याय आहे. दुधात ट्रिप्टोफॅन हे अमीनो आम्ल असतं जे सेरोटोनिनमध्ये रूपांतरित होतं. सेरोटोनिनचा मेंदूवर चांगला प्रभाव पडतो, जो शांत झोपण्यास मदत करतो. एक चिमूटभर जायफळ, एक चिमूटभर वेलची आणि काही बदाम दुधाची चव सुधारतील. त्याचबरोबर शांत झोपेला मदत करतील.
चेरी
चेरीमध्ये मेलाटोनिन, पाइनल ग्रंथीद्वारे तयार होणारे हार्मोन असतं, जे आपल्या झोपेचं चक्र नियंत्रित करण्यास मदत करतं. चेरी मानसिक थकवा आणि तणावासाठी खूप फायदेशीर मानली जाते. 10-12 चेरी खाल्ल्याने तुम्हाला चांगली झोप येते.