मुंबई : अनेकांना त्यांच्या दिवसाची सुरुवात चहाच्या पहिल्या घोटाने करतात. यामुळे त्यांना दिवसभर ऊर्जा वाटते. पण दूध आणि साखर याचा चहा प्यायल्याने शरीराचं नुकसान होतं. यासाठी आता बरेच जणं चहाऐवजी ग्रीन टी आणि लेमन टी पितात. पण या दौघांपैकीही कोणता चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी रिकाम्या पोटी काही गोष्टींचे सेवन केल्याने पित्त, चिडचिड आणि पोटासंबंधित इतर समस्या उद्भवू शकतात. 


लेमन टी


नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फार्मेशनप्रमाणे, लेमन टीमध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल गुणधर्म शरीराच्या आतील बाजूने साफ करतात. यामुळे वजन, साखरेची पातळी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं. त्याचप्रमाणे रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. 


ग्रीन टी


तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, ग्रीन टीमध्ये अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल, अँटी ऑक्सिडंट गुणधर्म असतात. याचं सेवन केल्याने हृदय आणि मन चांगले कार्य करते. शिवाय शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. औषधी गुणधर्म असलेला ग्रीन टी पिण्यामुळे कॅन्सरच्या सेल्स वाढण्यास प्रतिबंध करते.


कोणता चहा अधिक फायदेशीर


लिंबूंमध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-व्हायरल, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असून ते हंगामी रोगांपासून बचाव करतात. परंतु बर्‍याच वेळा रिकाम्यापोटी लिंबाचं सेवन केल्याने पित्त, पोटदुखी आणि पोटाशी संबंधित इतर समस्या उद्भवू शकतात.


दुसरीकडे ग्रीन टीमध्ये एंटी ऑक्सिडंट, एंटी-जेनोजेनिक, एंटी-वायरल गुणधर्म असतात, जे वजन कमी करतं तसंच मधुमेह आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.


तज्ज्ञांच्या मते, लेमन टीपेक्षा ग्रीन टी शरीरावर अधिक काळ प्रभाव दर्शवते. दररोज 1 कप लेमन टी पिण्याच्या तुलनेत ग्रीन टी पिणं फायदेशीर आहे.