मुंबई : फिट राहण्यासाठी ग्रीन टी घेण्याचा पर्याय अनेकजम निवडतात. सेलिब्रेटीही यात मागे नाहीत. बदलत्या जीवनशैलीमुळे तसेच कामाच्या वाढत्या तणावामुळे गेल्या काही वर्षांपासून ग्रीन टीचे सेवन वाढलेय.वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी अतिशय फायदेशीर असल्याचे आपण जाणतोच पण त्याचबरोबर अनेक आरोग्यदायी फायद्यांसाठी ग्रीन टी पिणे उपयुक्त ठरेल. तुम्हाला आहे का ग्रीन टी घेण्याची सवय? नसल्यास ती लावून घ्या. कारण ग्रीन टी मुळे फक्त वजनच कमी होणार नाही तर आरोग्याच्या इतर अनेक समस्याही दूर राहतील. तर मग हे वंडर ड्रिंक्स घेण्यास कधीपासून सुरुवात करताय?


उच्च रक्तदाब


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उच्च रक्तदाब असल्यास ग्रीन टी चे सेवन करा. यामुळे बीपी नियंत्रित राहण्यास मदत होईल. 


कोलेस्ट्रॉल


कोलेस्ट्रॉलची समस्या असलेल्यांसाठी ग्रीन टी फायदेशीर ठरते. त्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल कमी होऊन गुड कोलेस्ट्रॉल वाढवण्यास मदत होते.


मधुमेह


शरीरात साखरेची पातळी वाढली असल्यास ग्रीन टी उपयुक्त ठरते. मधुमेहींनी जेवणानंतर ग्रीन टी चे सेवन करावे. 


स्थुलता


ग्रीन टीच्या सेवनामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होतो. ग्रीन टी घेतल्याने मेटाबॉलिझम सुधारते. परिणामी शरीरात फॅट्स जमा होत नाहीत. 


कर्करोगाशी लढण्यासाठी


‘ग्रीन टी’ मध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीराला  कोणत्याही प्रकारच्या कर्करोगाशी अधिक सक्षमतेने लढण्यासाठी तयार करते. या अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटकांमुळे शरीरात फ्री रॅडीकल्सचा प्रभाव कमी होतो. अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक त्या रॅडीकल्सचा वेळीच नाश करतात.