Gudi Padwa 2023: हिंदूंचा वर्षारंभाचा दिवस म्हणजे वर्ष-प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा (Gudi Padwa 2023). यंदा गुढीपाडवा 22 मार्चला येत असून या दिवशी सकाळी घरोसमोर गुढी उभारली जाते. या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याचीही प्रथा आहे. तसेय या दिवशी कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद घेण्यामागेही शास्त्र आहे. कडुलिंबाची (Neem Tree) कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे , हिंग आणि मध मिसळून हा प्रसाद तयार केला जातो. पण यामागाचं सत्य कारण काय आहेत ते जाणून घ्या... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुढीपाडव्यादिवशी कडुलिंबाचे वेगळेचं महत्त्व आहे. ही पाने सदाहरित आणि सदापर्णी आहेत. याचे पाने, फुले, खोड हे सर्व घटक औषधाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. अनेक दुर्धर नाहीशा करण्याचे गुण कडुलिंबात आहेत. कडुलिंबाची पाने ही जंतुनाशक असल्याने गुढीवर लावतात. त्यामुळे घरात येणाऱ्या रोगजंतूंना अटकाव होतो. कडुलिंबाची पाने खाल्ल्याने आरोग्यही चांगले राहात असून यामध्ये कफ, ताप, उष्णता, पित्तनाशक असे अनेक गुण कडुलिंबामध्ये समाविष्ट असतात. 


वसंत ऋतूमध्ये कफाचा प्रभाव अधिक असतो. त्यामुळे कडूलिंबाचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो. यामुळे खोकला बरा होतो आणि आरोग्याला नवसंजीवनीही मिळते. त्यामुळेच याचा उपयोग गुढीपाडव्याला केला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची कोवळी पाने खाण्याची प्रथा आहे. तसेच कडुलिंब घालून तयार केलेला प्रसाद या दिवशी खाल्ला जातो. कडुलिंबाची कोवळी पाने, फुले, चण्याची भिजलेली डाळ, जिरे, हिंग आणि मध हे सर्व एकत्र करून हा प्रसाद वाटला जातो. तसेच कडुलिंबाच्या कोवळ्या पानांमध्ये चण्याची भिजवलेली डाळ, जिरे, ओवा, हिंग, चिंच, गूळ, मीठ हे सर्व पदार्थ मिक्स करून चटणी तयार करण्यात येते. या चटणीच्या सेवनाने शरीरामध्ये ऊर्जा प्राप्त होते असं समजण्यात येतं.   


वाचा:  H3N2 पासून बचाव करण्यासाठी काय करावे? जाणून घ्या टिप्स  


हे लाभदायक फायदे 


केसं व त्वचेसाठी : आरोग्य निरोगी राहण्यासाठी कडुलिंबांमध्ये मोठ्या प्रमाणात उपयुक्त घटकांचा समावेस आहे. यासाठी आपण घरच्या घरी हेअर पॅक व फेस पॅकही तयार करु शकतात. 


तोंडाचे आजार : तोंडाला येणारी दुर्गंधी, दात किडणे, हिरड्यांचे सुजणे यासारख्या समस्या दूर करण्यासाठी कडुलिंबाच्या पाल्याचा उपयोग केला जातो. 


मधुमेह : कडुलिंबाच्या कडवटपणामुळे रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रणात राहते. पण मधुमेहींना कडुलिंबाच्या पाल्याचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. 


रक्तदाब : उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रित करण्यासाठी कडुलिंबाच्या पाल्यामुळे बरीच मदत मिळते.