H3N2 Influenza Symptoms: 3 वर्षांनंतर आता कुठे भारतासह संपूर्ण देशाची कोरोनाच्या महामारीपासून सुटका होत होती, मात्र अशातच इन्फ्लूएंजा व्हायरस H3N2 ने पुन्हा एकदा चिंता वाढवली आहे. गेल्या काही दिवसांपासून सर्दी आणि ताप यांच्या प्रकरणांमध्ये वाढ होताना दिसतेय. याची वेळीच काळजी घेतली नाही तर हा साधा त्रास जीवघेणा ठरू शकतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR च्या म्हणण्यानुसार, गेल्या 2-3 महिन्यांमध्ये इन्फ्लूएंजा व्हायरसच्या A सबटाइप H3N2 मुळे सर्दी, खोकला आणि ताप यांच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. 


तज्ज्ञांच्या म्हणण्याप्रमाणे, H3N2 मुळे रूग्णालयात दाखल करणाऱ्या रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक, पंजाब आणि हरियाणा या भागांमध्ये H3N2 मुळे मृत्यू झाल्याची नोंद आहे. दरम्यान याबाबत अजून तपासणी केली जातेय.


इंडियन मेडिकल एसोसिएशन (IMA) ने माहिती दिली आहे, या माहितीनुसार, हंगामी तापाची साथ दिसून येतेय. हा ताप दोन-तीन दिवसांत जातो, पण सर्दी-खोकला तीन आठवडे राहतो. प्रदूषणामुळे 15 वर्षांखालील आणि 50 वर्षांवरील लोकांमध्ये श्वसनासंबंधीच्या संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली आहे.


H3N2 ची लक्षणं काय आहेत (H3N2 Virus Symptoms)


  • सर्दीमुळे नाक वाहणं

  • ताप

  • खोकला 

  • चेस्ट कंजेशन

  • डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, हंगामी इन्फ्लूएंझाची लागण झाल्यावर, ताप, खोकला, डोकेदुखी, स्नायू आणि सांधेदुखी, थकवा, घसा खवखवणं आणि नाक वाहणं यासारखी लक्षणं दिसून येतात.


H3N2 चा धोका कोणाला?


इन्फ्लूएंझा हा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. मात्र याचा सर्वात जास्त धोका गर्भवती महिला, 5 वर्षाखालील बालकं, वृद्ध व्यक्ती आणि इतर आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना आहे.


H3N2 कितपत धोकादायक?


बहुतेक लोक कोणत्याही उपचरांशिवाय इन्फ्लूएंझापासून बरे होताना दिसतायत. मात्र काही प्रकरणं गंभीर असू शकतात. इतकंच नव्हे तर यामध्ये रूग्णाचा जीव देखील जाऊन शकतो. डब्ल्यूएचओच्या मतानुसार, हाय रिस्क असलेल्या रूग्णांची रुग्णालयात दाखल होण्याची आणि मृत्यूची प्रकरणं अधिक सामान्य आहेत