मुंबई : कधी मज्जा म्हणून असेल तर कधी ताण, झोप यांना पळवून लावण्यासाठी तुम्ही टपरीवर चहा पिता. यूज अ‍ॅन्ड थ्रो प्लॅस्टिकच्या प्लेट्स वापरून तुम्ही पाण्याचा अपव्यय टाळता. पण अशा लहानसहान वाटणार्‍या अनेक गोष्टी नकळत आपल्या शरीरात कॅन्सरचा धोका वाढवत आहेत हे तुम्हांला ठाऊक आहे का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅन्सर हा एक असा आजार आहे की अनेकदा त्याचं निदान गंभीर स्वरूप धारण केल्यानंतरच आपल्या लक्षात येते. मग पहा अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हांला कॅन्सरचा धोका बळावू शकतो. कॅन्सरचा धोका दूर ठेवण्यासाठी आहारात हवेच हे '5' पदार्थ


प्लॅस्टिकचे कप -


कप धुण्याची कटकट नको म्हणून अनेकदा फोम किंवा प्लॅस्टिकच्या कपातून चहा दिला जातो. मात्र ही सवय आरोग्याला  त्रासदायक आहे. प्लॅस्टिकमधील बिस्फिनॉल-ए आणि डाईडथाइल हेक्सिल फैलेट हे घटक घातक आहेत. 


प्लॅस्टिकचे डब्बे, डिश 


अनेकदा हॉटेल्समधून ऑर्डर केलेलं अन्न प्लॅस्टिकच्या कंटेनरमध्ये पॅककरून दिले जातात. मात्र अनेकजण अशी कंटेनर्स घरात साठवतात. त्याचा पुन्हा पुन्हा वापर करतात. मात्र यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. 


मायक्रोव्हेव पॉपकॉर्न 


जेरूसलममधील ल्यूटेनबर्ग सेंटर फॉर इम्यूनोलॉजी आणि कॅन्सर रिसर्चचे चेयरमॅन प्रोफेसर ईटन यफेनोफ यांनी केलेल्या दाव्यानुसार. मायक्रोव्हेवमध्ये शिजवलेले आर्टिफिशिअल बटरयुक्त पॉपकॉर्न आरोग्याला त्रासदायक आहे. यामधील विषारी घटक फुफ्फुसांच्या कॅन्सरला कारणीभूत ठरतात. 


ग्रिलिंग़ 


ग्रिलिंग प्रक्रियेद्वारा अन्न शिजवताना त्यासाठी उच्च तापमानाचा वापर केला जातो. हे कॅन्सरला कारणीभूत ठरते. या प्रक्रियेमधील heterocyclic घटक कॅन्सरसाठी कारणीभूत ठरते. WHO च्या अहवालानुसार, रेड मीट खाणंदेखील आरोग्याला धोकादायक आहे. 


डब्बाबंद पदार्थ 


पॅक्ड, डब्बाबंद पदार्थ आरोग्याला त्रासदायक आहे. प्लॅस्टिकच्या बॉटलमधील सॉफ्ट ड्रिंक्सदेखील आरोग्याला धोकादायक आहेत. अशा डब्यांमध्ये बिस्फेनॉल-ए (बीपीए) घटक असतात. यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. प्लॅस्टिकच्या अशा पदार्थांना 'हे' आहेत इको फ्रेंडली पर्याय