मुंबई : उन्हाळा सुरु झालाय आणि त्यासोबतच या मोसमात येणार्या समस्याही. उन्हाळ्यात केसांमध्ये कोरडेपणा आणि खाजेमुळे त्रास होतो. उन्हाळ्यातही केस चमकदार ठेवायचे असतील तर त्यासाठी काळजी घेणे गरजेचे असते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक्सपर्ट्सच्या मते  चांगल्या शाम्पूने नियमितपणे केस धुवा. तसेच कडक उन्हात जात असाल तर स्कार्फ अथवा दुपट्टा घ्या.


केस मुलायम ठेवण्यासाठी सूदिंग अथवा रिफ्रेशिंग मास्कचा वापर करा.


केस कोरडे झाल्यास अथवा केसांत खाज य़ेत असल्यास ते नेहमी स्वच्छ करा. कडक उन्हात निघत असल्यास टोपी अथवा स्कार्फने केस झाका.


आठवड्यातून तीन वेळा तेलाने डोक्याला मसाज करा. त्यानंतर केस चांगले धुवा. 


कधीही गरम पाण्याने केस धुवू नका. कोमट पाण्याचा वापर करा. तसेच हेअर ड्रायरचा वापर करु नका. 


केस धुतल्यानंतर नॅचरल तेल अथवा क्रीमचा वापर करा. केसांना सतत जेल अथवा हेअर स्प्रेचा वापर करु नका. 


त्वचेमध्ये ओलावा कायम राखण्यासाठी भरपूर पाणी प्या. कडक उन्हात गरज असेल तरच जा. दररोज १० मिनिटे प्राणायाम करा.