Benefits Of Pumpkin Seeds For Hair : अनेकजण केस गळतीमुळे त्रासले असून अनेक उपाय केले तरी कसलाच फायदा झाला नाही. बाजारातील अनेक केमिकलची औषधे लावली तरीही काही फरक दिसला नाही. मात्र हा घरगुती उपाय करून पाहा फरक नक्की दिसेल. भोपळ्याच्या बिया केसांसाठी खूप फायदेशीर असतात. यामुळे केस गळण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते आणि केसांची चमक परत येते. तसेच जर तुमचे केस पातळ झाले असतील किंवा केसांशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर तुम्ही भोपळ्याच्या बिया वापरा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जर तुमचे केस वेगाने गळत असतील तर तुम्ही भोपळ्याच्या बिया वापरू शकता. हे केसांना झपाट्याने वाढण्यास आणि चमकदार बनविण्यास मदत करते. याचा समावेश तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात करू शकता. यासोबतच याच्या बियांमध्ये आढळणारे घटक केसांना आतून पोषण देतात.


तुमचे केस कुरळे असतील तर ते तुटण्याची शक्यताही खूप जास्त असते. तसेच तुमचे केस दुतर्फा आणि मुळापासून कमकुवत असल्यास ते तुमच्यासाठी हानिकारकच राहते. कोरडेपणामुळे केस खूप तुटतात. त्यामुळे केसांमध्ये भोपळ्याच्या बिया वापरा. यामुळे केस सुंदर आणि आकर्षक दिसतील.


कोंडा ही केसांची सर्वात मोठी समस्या बनते. एकदा कोंडा झाला की तो सहजासहजी जात नाही. त्यामुळे केस गळतीही होऊ शकते. त्यामुळे केस गळणे थांबवण्यासाठी आणि कोंडा दूर करण्यासाठी भोपळ्याच्या बिया वापरा.


(Disclaimer: वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. दैनंदिन आयुष्यात याचा वापर करायचा झाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)