Hair Fall: तुमचेही सतत केस गळतात? आहारात करा `या` गोष्टींचा समावेश, होतील फायदेच फायदे...
hair fall solution : तुमचेही सतत केस गळत असेल तर आहारात बदल करा
Hair fall solution: धगधगत्या जीवनशैलीमुळे अनेकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. तर दररोजच्या धावपळीमुळे अनेकांना केसांच्या समस्या देखील उद्भवतात. वेगवेगळे उपाय करून देखील केस गळती थांबत नाही (how to stop hair fall immediately). त्याला वेगवेगळी कारणं देखील आहेत. मात्र, पुरेपर आहार घेणं केसासांठी फायद्याचं ठरतं (hair fall solution). अशातच आता आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास केसगळती थांबवता येऊ शकते. (hair fall are you constantly losing hair include things in your diet)
अंड्यातील पिवळं बलक (Egg yolk) -
अंड्यातील पिवळं बलक खाल्ल्यानं झिंकची कमतरता भरून काढता येते. यामध्ये झिंक, कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन बी 12, थायामिन, व्हिटॅमिन बी 6, फोलेट आणि फॉस्फरस सारखे घटक आढळतात. त्याचा फायदा तुमच्या केसांना नक्कीच होतो.
काजू (cashew) -
प्रथिने मिळविण्यासाठी अंडी खातात. त्यात बायोटिन, जीवनसत्त्व D 3, जीवनसत्त्व B आणि ओमेगा 3 फॅटी अॅसिड देखील असतात, ज्यामुळे केसांच्या वाढीचा वेग वाढतो. खाण्याव्यतिरिक्त केसांना अंडी लावल्यानंतर डोकं धुणं देखील फायदेशीर आहे.
लसून (Garlic)-
दररोज आहारात लसनाचा समावेश असल्यास केसांना मोठा फायदा होतो. लसूनमध्ये जीवनसत्त्वे A, B आणि K, आयोडीन, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांसारखे पोषक तत्व आढळतात. त्यामुळे केसांची जाडी वाढते.
शेंगदाणे (Peanuts) -
दररोजच्या जेवणात शेंगदाण्याचा वापर केसांसाठी फार उपयोगीचा असतो. यातून लोह, पोटॅशियम, फॉलिक अॅसिड, व्हिटॅमिन E, मॅग्नेशियम आणि फायबर देखील मिळतात. त्यामुळे तुमची केसं आणखी जाड होण्यास मदत होते.
तीळ (benne) -
तीळ केसांच्या वाढीसाठी चांगले असतात. तिळामध्ये झिंक, प्रोटीन, कॅल्शियम, कार्बोहायड्रेट्स, फॉलिक अॅसिड आणि बी कॉम्प्लेक्स असतात. त्यामुळे तुमच्या केसांची वाढ चांगली होते.
(Disclaimer: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)