चिमुकल्यावर औषधांची रिअॅक्शन; संपूर्ण शरीरावर उगवले केस, कारण ऐकून व्हाल थक्क
अनेकदा औषधांमुळे दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं.
मुंबई : तुम्ही आतापर्यंत अनेक दुर्मिळ आजारांबद्दल ऐकलं असेल. अनेकदा औषधांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबद्दल तुम्ही ऐकलं असेल. पण आता तुम्ही जे सांगणार आहात, कदाचित तुम्हाला याची माहितीही नसेल. अमेरिकेत एका चार महिन्यांच्या मुलाला एका औषधाचा इतका दुष्परिणाम झाला की शरीरावर केस वाढले. अशा स्थितीला वैद्यकीय भाषेत हाइपरइंसुलिनिस्म (Hyperinsulinism) म्हणतात.
जेव्हा पालकांना त्याच्या मुलाच्या दुर्मिळ आजाराबद्दल कळलं तेव्हा त्यांनी बाळाच्या शारीरिक लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपचार सुरू केले. ज्यामुळे मुलाचं आरोग्य सुधारलं पण त्याचे दुष्परिणामही झाले. लोकांनी सोशल मीडियावर या दुर्मिळ प्रकरणावर विचित्र प्रतिक्रिया दिल्या. मात्र यावर 'लोकं काय विचार करतात याची मला पर्वा नाही, मी फक्त माझ्या मुलाबरोबर आनंदी आहे,' असं मत बाळाच्या आईने व्यक्त केलं.
हा एक दुर्मिळ जन्मजात आजार आहे. मुलाच्या आईने सोशल मीडिया आणि नेटीझन्सना सांगितलं की, तिच्या मुलाला रोगाशी लढण्यासाठी डायझॉक्साईड औषध द्यावं लागतंय. औषधाच्या दुष्परिणामामुळे त्याच्या शरीरावर दाट आणि केस वाढू लागले. हळूहळू केस संपूर्ण शरीरावर आले. यानंतर बाळाच्या चेहऱ्यावर, हातावर आणि पायांवर केस दिसू लागले.
या बाळाचं नाव मातेओ हर्नांडेझ आहे. जेव्हा तो अवघ्या एका महिन्याचा होता, तेव्हा त्याला हाइपरइंसुलिनिस्म नावाच्या आजाराचं निदान झालं. डेली मेलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, या आजारात, स्वादुपिंडातून हाय लेवलंच इन्सुलिन तयार होऊ लागतं. ही रक्तातील साखरेशी संबंधित समस्या आहे. हा दुर्मिळ आजार मानला जातो कारण ही वैद्यकीय स्थिती 50,000 मुलांपैकी एकाला प्रभावित करतो.
Note: ( All photo credit: kennedy)