डोक्यातील उवा ही एकप्रकारे मोठीच समस्या आहे त्यातून पावसाळ्यात उवांचा धोका वाढतो. हेअर लाईस हा एक प्रकारचा परजीवी आहे म्हणून ते जास्तकरून टाळू आणि केसांना चिकटून राहतात आणि आपल्या टाळूचं रक्त शोषून घेतात. पावसाळ्यात त्यांची प्रजनन वेगाने सुरू होते. एकदा डोक्यातील उवा वाढू लागल्या की त्या पूर्णपणे काढून टाकणे खूप कठीण होते. पण कडुलिंबाच्या पानांच्या (Lice Home Remedy) मदतीने तुम्ही डोक्यातील उवांची समस्या दूर करू शकता. (hair tips : these are the tips for reducing the problem of lice in hair follow these steps)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उवा दूर करण्यासाठी तुम्हाला फक्त कडुलिंबाचा 'या' पद्धतीने वापर करायचा आहे. कडुनिंबाच्या पानांमध्ये भरपूर अँटी-बॅक्टेरियल (Anti - Bacterial) आणि अँटी-फंगल (Anti - Fungal) गुणधर्म असतात जे टाळू आणि केसांसाठी फायदेशीर असतात. कडुलिंबाच्या वापरामुळे डोक्यातील उवांसाठी जे योग्य वातावरण असते ते हळूहळू निघून जातं आणि टाळू आणि केस पूर्णपणे संक्रमणमुक्त होतात. त्यामुळे डोक्यातील उवांना पोषण आणि योग्य वातावरण मिळाले नाही की त्या मरायला लागतात.


आणखी वाचा : भर कार्यक्रमात विवाहित कलाकारासोबत LIP LOCK; VIDEO व्हायरल


1. केसांच्या उवांसाठी ताजी कडुलिंबाची पाने वापरा - 
कडुलिंबाच्या पानांचा उपयोग तुम्ही उवा घालवण्यासाठी करू शकता. यासाठी कडुलिंबाची पाने पाण्यात उकळून पाणी गाळून घ्या. जेव्हा तुम्ही तुमचे केस शॅम्पूने धुता तेव्हा या पाण्याने तुमचे डोकं देखील धुवा. आठवडाभर असे केल्याने तुम्हाला परिणाम दिसून येईल.


2. डोक्यातील उवा मारण्यासाठी कडुलिंबाचे तेल वापरा - 
केसांच्या उवा मारण्यासाठी कडुनिंबाचे तेल आणि खोबरेल तेल समान प्रमाणात मिसळा आणि 10 मिनिटे टाळूची मालिश करा. यानंतर कंगवा फिरवून केस आणि डोक्यातील उवा काढा आणि नंतर शॅम्पू लावा. असे निदान आठवडाभर करा.


आणखी वाचा : Amir सारखी बॉडी करायला गेला आणि 10 दिवस दवाखान्यात भरती झाला 'हा' अभिनेता 


3. उवा काढण्यासाठी सुक्या कडुलिंबाची पाने वापरा - 
उवा काढण्यासाठी सुक्या कडुलिंबाची पाने बारीक करून पाण्याने पेस्ट बनवा. या पेस्टमध्ये लिंबाचा रस घाला आणि केस आणि टाळूला चांगले लावा. एक तासानंतर केस शॅम्पूने धुवा आणि आठवड्यातून 3 ते 4 वेळा तरी असं करून बघा. 


(Disclaimer : वर दिलेली माहिती ही सामान्य ज्ञान आणि घरगुती उपायांवर आधारित आहे. ZEE 24 Taas याची खात्री करत नाही.)