नवी दिल्ली : हेल्दी डाएटमध्ये अनेक लोक आहारात काकडी-टोमॅटो अशा एकत्रित सलाडचा समावेश करतात. अनेक जण टोमॅटो-काकडीची कोशिंबीर करुनही खातात. परंतु टोमॅटो Tomato-काकडीच्या cucumber एकत्रित सेवनाने तब्येत बिघडण्याची शक्यता असू शकते. काकडी-टोमॅटोचं एकत्रित सेवन आरोग्यास योग्य नसल्याचं हेल्थ एक्सपर्ट्सचं म्हणणं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, काकडी आणि टोमॅटो यांच्या एकत्रित सेवनाने गॅस, पोटदुखी, थकवा, अपचन, मळमळ अशा समस्या होऊ शकतात. काकडी-टोमॅटो एकमेकांच्या विरुद्ध मानले जातात. या दोघांची पोटात पचण्याची वेळही वेग-वेगळी असते. त्यामुळे दोन्ही एकत्र खाण्याने समस्या निर्माण होऊ शकतात.


एक्सपर्ट्सनुसार, टोमॅटो आणि काकडी स्लो आणि फास्ट डायजेशनवाले पदार्थ आहेत. स्लो आणि फास्ट डायजेशन होणारे पदार्थ एकत्र खाल्याने, एक पदार्थ पचून इंटेस्टाईन अर्थात आतड्यांमध्ये पहिलं पोहचतं. तर दुसऱ्याची प्रोसेसिंग सुरु राहते. त्यामुळे या दोघांचं एकत्रित खाणं शरीरासाठी नुकसानदायक ठरु शकतं. 


आरोग्य तज्ञांचं असं म्हणणं आहे की, काकडीमध्ये पौष्टिक तत्व असतात, जे शरीराला हायड्रेटेड ठेवतात. पण काकडीमध्ये एक असाही गुण आहे, जो सी व्हिटॅमिन शोषण्यात हस्तक्षेप करतो. त्यामुळे काकडी-टोमॅटो एकत्रित न खाण्याचा सल्ला दिला जातो. काकडी-टोमॅटो दोन्ही वेग-वेगळं खावं. एकाचा दुपारच्या तर दुसऱ्याचा रात्रीच्या जेवणात समावेश करु शकता. त्यामुळे दोन्हींचा शरीराला चांगला फायदा होईल.