मुंबई : आजच्या धका-धकीच्या जीवनात प्रत्येक जण आपल्या आरोग्या कडे दुर्लक्ष करतो. सततच्या कामाच्या व्यापाने आणि वेळेत पुरक आहार न घेतल्याने अनेक गंभीर आजार उद्भवतात. व्यस्त जीवन शैलीमुळे जेवणाच्या वेळा देखील अगदी रोज चुकतात. आपण लक्षात घ्यायला हवं ही साधी गोष्ट नाही, याचे गंभीर परिणाम आपल्या आरोग्यावर नकळत होत असतात. त्यापैकी एक म्हणजे, हात-पाय सुन्न होणे. रात्री झोपेत असताना अचानक एका बाजूचे हात-पाय सुन्न होतात. खूप वेळ एकाच ठिकाणी काम करत राहिल्याने हात-पाय सुन्न होतात. शरीरावर दबाव पडल्याने अशा समस्या उद्भवतात. सतत शीत पेय, मद्याचे अधीक सेवन केल्याने हात-पाय सुन्न हेतात. याशिवाय मधुमेह, थकवा, व्हिटॅमीन बी, मॅग्नेशियम यांसारखे पोषक तत्वे कमी असल्यामुळे सुद्धा ही समस्या उद्भवते. हात-पायाचे सतत सुन्न हेणे गंभीर आजाराचे संकेत असू शकतात. वेळेतच प्रसंगवधान बाळगले तर ही समस्या कायमची दूर केली जाऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हात-पाय सुन्न होत असल्यास घरगुती उपाय
शरीरातील रक्त प्रवाहात अडथळे निर्माण हेत असल्यास हात-पाय सुन्न होतात. त्याप्रमाणे शरीरातील एक नस दबल्याने सुद्धा ही समस्या उद्भवते. तर काही घरगुती उपायांमुळे ही समस्या काही प्रमाणात कमी होवू शकते. 


- शिवण काम केल्याने हात-पाय सुन्न होत नाहीत.


- ऑलिव्ह, नारळ आणि ,सरसोच्या तेलाने मालीश केल्याने हात-पाय सुन्न होत नाहीत. या तेलांनी मालीश केल्याने रक्त प्रवाह सुरळीत होतो. 


- सुन्न झालेल्या भागावर गरम पाण्याचे शेक घेतल्याने रक्तात असलेली कमतरता भरून काढण्यास मदत होते. हा रामबाण उपाय सुन्न झालेल्या भागांमधील मांसपेशी आणि नसांना आराम देतो. 


- एक स्वच्छ कापड गरम पाण्यात भिजवून प्रभावित भागात पाट ते दहा मिनिटे लावल्यास हात पाय सुन्न होत नाहीत.


- नियमित फक्त १५ मिनिटे व्ययाम केल्याने हात-पाय सुन्न होत नाहीत. व्यायाम केल्याने शरीरात रक्त प्रवाह सुरळीत राहतो. 


- आठवड्यातून तीस मिनिटे अॅरोबिक्स, सायकलींग, धावल्याने, पोहोल्याने हात पाय सुन्न होत नाहीत. 
   
- हळदीमध्ये अॅन्टी इन्फ्लेमेंटरी सारखे तत्वे असतात प्रभावित भागाचे दुखणे काही प्रमाणात कमी होऊ शकतो. 


- एक ग्लास दुधामध्ये एक चमच हळद मंद आचेवर घ्या आणि एक चमच मध एकत्रित करून प्यायल्याने रक्त प्रवाह सुरळीत राहतो. 


- दालचीनीमध्ये व्हिटॅमीन बी, मॅग्नेशियम, पोटॅशियम महत्वपूर्ण घटक असतात. नियमीत रोजच्या आहारात ४ ग्रॅम दालचीनीचा समावेश करावा.