मुंबई : हिवाळ्याच्या दिवसात त्वचेची शुष्कता अधिक वाढते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ओठदेखील फुटातात. तेथील त्वचा अधिक रूक्ष होते. अशावेळेस त्वचेमध्ये कोमलता टिकून ठेवण्यासाठी काहीजण सर्रास लीपबामचा वापर करतात. 


लिपबाममुळे तात्पुरते ओठ ओलसर वाटतात. मात्र लीपबाममधील काही घटक त्वचेचे नुकसान करू शकतात. म्हणूनच त्वचेचे नुकसान करण्यापूर्वी हा सल्ला नक्की वाचा. 


लीपबाममधील कोणते घटक ठरू शकतात त्रासदायक ? 


मेन्थॉल 


मेन्थॉल कुलिंग घटक असले तरीही संवेदनशील त्वचेचे मात्र नुकसान होते. त्याऐवजी शिआ बटर असलेले लीप बाम निवडा.  शिआ बटरमुळे ओठाची त्वचा मुलायम राहते.  
 


व्हिटॅमिन ई 


व्हिटॅमिन ई  त्वचेसाठी फायदेशीर आहे. पण  काहींना ते त्रासदायकही ठरू शकते. क्रीममधील व्हिटॅमिन ई अ‍ॅलर्जिक ठरू शकते. तुम्हांला व्हिटॅमिन ई चा त्रास असल्यास बीवॅक्सयुक्त लीपबाम वापरा.


 सुवास 


 
लीप बाम अधिक आकर्षक बनवण्यासाठी त्यामध्ये काही सुवासिक घटकांचा वापर केला जातो. यामुळे ओठांचे नुकसान होऊ शकते. सिनॅमन म्हणजेच दालचिनीयुक्त काही पदार्थ असल्यास त्रास होण्याचा धोका अधिक असतो. 


काय उपाय कराल  ? 


हिवाळ्यात ओठांचे नुकसान होऊ नये म्हणून रात्री झोपण्यापूर्वी ओठांना साजुक तूप लावून झोपावे.  


रात्री झोपण्यापूर्वी ओठांवरील लीपस्टिक आणि लीपग्लॉसदेखील हमखास काढावा. यामुळे ओठांचे नुकसान टाळता येते. तसेच ओठ कापसाच्या बोळ्याने स्वच्छ करावेत.  


इतरांसोबत लीपस्टिक किंवा लीपग्लॉस शेअर करू नका. यामधून इंफेक्शन पसरण्याची शक्यता असते.