मुंबई : मासिक पाळी एक असा मुद्दा आहे ज्याबद्दल अजूनही मनमोकळेपणाने बोलत नाही. शिवाय मासिक पाळीदरम्यान महिलांनी अनेक गोष्टींचं पालन करावं लागतं. यामध्ये लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतो. आज आम्ही मासिक पाळीसंदर्भातील अशाच काही गैरसमजांबद्दल माहिती देणार आहोत ज्यांना मागे काही वैज्ञानिक कारण नाही.


मासिक पाळीचे चारच दिवस असले पाहिजेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रत्येक महिलेच मासिक पाळीचं चक्र वेगवेगळं असतं. हे पूर्णपणे त्या महिलेच्या शरीरावर अवलबूंन असतं. यामध्ये काही महिलांना तीन तर काहींना चार दिवस मासिक पाळी येते. साधारणपणे मासिक पाळी 2-8 दिवस असते. जर तुमचा कालावधी 2 पेक्षा कमी आणि 8 पेक्षा जास्त असेल तर तुम्ही डॉक्टरांशी संपर्क साधावा.


या दिवसांत आंबट गोष्टी खाऊ नये


मासिक पाळी दरम्यान खाण्यापिण्याबाबत बरेच निर्बंध आहेत. काही स्त्रिया मासिक पाळी दरम्यान आंबट खाणं टाळतात. त्यांना लोणचं, लिंबू यांसारखे पदार्थ खाण्यावर निर्बंध घातले जातात. मात्र यामागे कोणतेही कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. हे सर्व आपल्या पूर्वजांनी तयार केलेल्या गोष्टी आहेत. मात्र आजच्या घडीला मासिक पाळी दरम्यान महिलांनी निरोगी आणि संतुलित आहार घेणं आवश्यक आहे. मासिक पाळीशी संबंधित समस्या टाळण्यासाठी डॉक्टर जंक फूडचं सेवन टाळण्याचा सल्ला देतात.


मासिक पाळीतील प्रवाह अशुद्ध मानलं जातं


आजही आमच्या घरात आजी आणि आजी ठामपणे मानतात की मासिक पाळीचे रक्त अशुद्ध असतं. मात्र असं काहीही नसतं. उलट हा भ्रम मोडीत काढण्याची गरज आहे. पीरियड रक्त गलिच्छ नाही किंवा ते शरीरातून कोणत्याही प्रकारचं विष काढून टाकत नाही. ही एक शारीरिक प्रक्रिया आहे, ज्याबद्दल बोलण्यास लाज वाटू नये. 


मासिक पाळी दरम्यान केस धुवू नये


मासिक पाळी दरम्यान आंघोळ करणं, केस धुणं, मेकअप वापरणं यांचा काहीही संबंध नाही. पण हा एक गैरसमज आहे, जो बऱ्याच काळापासून लोकांच्या मनात कायम आहे. सत्य हे आहे की महिलांनी आंघोळ करून नियमित स्वच्छता राखली पाहिजे. यामुळे महिलांना मासिक पाळीशी संबंधित अनेक आजार टाळण्यास खूप मदत होईल.