मुंबई : आपल्या आरोग्यावर आहाराचा मोठा परिणाम होतो. त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी आहार कसा असावा याबाबत  अनेक सल्ले मिळाले असतील पण तो आहार कधी घ्यावा? याबाबतची वेळदेखील तुमच्या आरोग्यावर कळत नकळत परिणाम करत असते. धकाधकीच्या बनत चाललेल्या आपल्या जीवनात खाण्या-पिण्याच्या, झोपण्याच्या वेळा बदलत चालले आहेत. याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो. पूर्वीच्या काळी सूर्यास्तापूर्वी आहार करण्याचा नियम असे. कदाचित  हेच त्यांच्या दीर्घायुषी आणि निरोगी आरोग्याचं गुपित असावं असं म्हटलं जातं. मग खरंच सूर्यास्तापूर्वी  जेवण आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं का? 


रात्रीचं जेवण सूर्यास्तापूर्वी घ्यावं का? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रात्रीचं जेवण लवकर घेतल्याने ते पचायला सोपं असतं. शरीरात कॅलरीज बर्न होण्यास अधिक वेळ मिळतो. रात्रीच्या वेळेस पचायला हलकं, कमी कॅलरीज असणारे पदार्थ निवडा. म्हणून रात्री 7च्या नंतर उपाशी राहण्याची सवय लावू नका. 


रात्रीच्या जेवणाचं पथ्यपाणी 


रात्री 9च्यानंतर भरपेट जेवणाची सवय टाळा.  


रात्री उशिरा जेवल्याने पचनसंस्थेचं कार्य बिघडतं. त्याचा परिणाम झोपेवरही होऊ शकतो. 


रात्री पित्त, खोकला, छातीत दुखणं असे त्रास जाणवल्याने झोपमोड होऊ शकते. 


रात्री झोपण्यापूर्वी खूप पाणी पिण्याची सवयही टाळा. यामुळे रात्री-अपरात्री वॉशरूमला जावं लागतं. 


रात्री भूक लागल्यास काय कराल ? 


रात्री सूर्यास्तापूर्वी जेवणाची सवय तुम्ही यशस्वीरित्या आजमावली तरीही अनेकदा रात्री भूक लागू शकते.  अशावेळेस आहारात कशाचा समावेश कराल? याकडे लक्ष द्या. प्रोटीनयुक्त पदार्थांचा आहारातील समावेश वाढवा. यामुळे वेळी अवेळी लागणार्‍या भूकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. 


अनेकजण वजन घटवण्यासाठी त्यांच्या आहारामध्ये अशाप्रकारचा बदल करतात. त्यामुळे योग्य आहारतज्ञांचा सल्ला घेऊन तुमच्या जीवनशैलीनुसार आहार आणि त्याच्या वेळा निश्चित करा.