गरमागरम पदार्थ खाल्ल्याने जीभ जळालीय, असा मिळवा आराम
जीभ जळाल्यानंतर `या` गोष्टी खा,जळजळ होईल दुर
मुंबई : गरमागरम पदार्थ खाल्ल्यावर किंवा गरम प्येय प्यायल्यावर आपली जीभ जळाल्याच्या अनेक घटना अनेकांसोबत घडल्या असतील. जीभ जळाल्यानंतर त्याचे फोडात रूपही घेते. जो तुमच्यासाठी नेहमीचा त्रास बनतो. त्यामुळे या समस्येपासुन कसं बाहेर यायचं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. आज आम्ही तुम्हाला असेच काही घरगुती उपाय सांगत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमची जळलेली जीभ बरी करू शकता. चला जाणून घेऊया हे उपाय.
आईस्क्रीम
मसालेदार किंवा गरमागरम पदार्थ खाल्ल्याने तोंड जळत असेल तर तुम्ही आईस्क्रीम खाऊ शकता. यामुळे तुमच्या जिभेची सूज कमी होईल आणि जिभेला आरामही मिळेल. तुम्ही आईस्क्रीमचे छोटेसे चावे घेता आणि जिभेच्या भागात जळजळ होते, ती तिथे वितळू द्या. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.
मध
मध तुमच्या जिभेची जळजळ कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. १ चमचा मध तोंडात घ्या आणि थोडा वेळ ठेवा. लवकर आराम मिळण्यासाठी दिवसातून २ ते २ वेळा मधाचे सेवन करावे.
च्युइंगम
जिभेची जळजळ दूर करण्यासाठी तुम्ही पेपरमिंट युक्त च्युइंगम घेऊ शकता. वास्तविक, ते तोंडात लाळ बनवण्याचे काम करतात, ज्यामुळे तुमच्या तोंडात नेहमी पाणी राहील, मग तुम्हाला जळजळीत खूप आराम मिळेल.
दही
जिभेची जळजळ कमी करण्यासाठी दही हा सर्वोत्तम आणि नैसर्गिक उपाय आहे. जीभ जळताच दह्याचे सेवन करावे. दही थंड असेल तर अजूनच छान. दही काही वेळ तोंडात राहू द्या. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळेल.