नवी दिल्ली : भारतीय खाद्यसंस्कृतीत तूपाचे महत्त्व फार आहे. अनेक पदार्थांमध्ये तूपाचा आर्वजून वापर होतो. हे तूप किती आरोग्यदायी आहे, माहित आहे का? जाणून घ्या...


लांबसडक, घनदाट केसांसाठी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केसांना तूप लावल्याने केस मऊसूत होतात. ते जोमाने वाढू लागतात. तुम्ही तूपाचा हेअरमास्क बनवून देखील केसांना लावू शकता. यासाठी २ चमचा तूपात एक चमचा खोबरेल तेल मिसळून केसांना लावा. केसांच्या मुळांना हलक्या हाताने मसाज करा आणि ३० मिनिटे ठेवून नंतर केस स्वच्छ धुवा.


डार्क सर्कल्स दूर करण्यासाठी


तूपाने डार्क सर्कल्स दूर होण्यास मदत होते. एक थेंब तूप आपल्या डोळ्यांभोवती लावा आणि हलका मसाज करा. रात्रभर तूप डोळ्यांभोवती राहिल्यानंतर सकाळी चेहरा स्वच्छ धुवा. नियमित हा उपाय केल्यास तुम्हाला लवकरच परिणाम दिसून येतील.


त्वचेसाठी


त्वचेला पोषण देण्यासाठी तूप अत्यंत उपयुक्त आहे. दोन चमचे तूप गरम करून त्यात पाणी मिसळा. ते त्वचेवर लावा. १५ मिनिटांनी त्वचा स्वच्छ करा. त्यामुळे त्वचा मऊसुत आणि चमकदार होईल.


ओठांसाठी


ओठ फाटत असल्यास तूपाचा वापर करा. ओठांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी एक थेंब तूप ओठांना लावा. असे नियमित करा आणि परिणाम बघा.