मुंबई : सकाळी रिकाम्या पोटी दुधी भोपळ्याचा रस पिणे हृदयरोग, मधुमेह, बद्धकोष्ठता, यकृताच्या समस्या, मूत्राशयाशी निगडीत अडचणी तसेच नैराश्य या समस्या कमी होण्यास मदत होते. आयुर्वेद आणि पर्यायी उपचार करणाऱ्यांकडून हा रस पिण्यास सांगितले जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनर्जीसाठी - सकाळी उठून जर तुम्ही वर्कआऊट करत असाल तर दुधीचा रस जरुर प्यावा. 


युरिन इन्फेंक्शन -  लघवीच्या ठिकाणी जळजळ होत असल्यास दुधीचा रस पिणे उत्तम. लघवीमध्ये अॅसिडचे प्रमाण अधिक वाढल्यास जळजळीचा त्रास होतो. दुधीचा रस प्यायल्यास हा त्रास कमी होतो. 


शरीरातील अशुद्धी बाहेर फेकण्यासाठी - रिकाम्या पोटी एक ग्लास दुधीचा रस प्यायल्याने एनर्जी मिळते. तसेच दुधीच्या रसात ९८ टक्के पाणी आणि अँटी ऑक्सिडेंटस असतात. ज्यामुळे शरीरातील अशुद्ध घटक बाहेर फेकले जातात. यामुळे शरीराला थंडावा मिळतो. 


वजन घटवण्यासाठी फायदेशीर - दुधीच्या रसात कॅलरीज आणि फॅट्स नसतात. यामुळे तुम्ही वजन घटवत असाल तर दुधीचा रस प्यावा. यातील फायबर भूक कंट्रोल करण्यात मदत करतात. 


बद्धकोष्ठतेच्या त्रासावर गुणकारी - तुम्हाला जर बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर सकाळी दुधीचा रस प्यायल्याने फायदा होतो. 


भोपळ्याचा रस दिर्घकाळ बंद बाटलीत असेल आणि चवीला थोडा जरी कडू लागला तरी तो खराब आहे असे समजावे आणि तो अजिबात पिऊ नये. कारण त्यातून गंभीर इजा उद्भवण्याची शक्यता असते.