मुंबई : दह्याचे सेवन नेहमीच शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. दह्याचे नियमित सेवन शरीरासाठी अमृतासमान मानले जाते. पचनासाठी दही अतिशय उपयोगी आहे. पचनक्रिया योग्य नसेल तर तुम्हाला आरोग्याच्या अनेक समस्या जाणवतात. यावेळी दह्याचे सेवन केल्यास खूप फायदा होतो. अपचन, बद्धकोष्ठता, गॅससारख्या समस्यांपासून दह्यामुळे सुटका मिळते. दह्यामध्ये पाचनशक्ती सुधारणारे घटक असतात. दररोज दही खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते. तसेच अनेक आजारांपासून बचाव होतो. दह्याचे सेवन दात आणि हांडांच्या आरोग्यासाठीही चांगले आहे. तसेच शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. दही-काळे मीठ आणि भाजलेले जिरे एकत्रित करुन सेवन केल्यास भूक वाढण्यास मदत होते. पाचनशक्ती सुधारते.


२. दही आणि मध एकत्रित करुन खाल्ल्यास अँटी बायोटिकप्रमाणे काम करते. हे खाल्ल्याने अल्सरचा त्रास दूर होतो. 


३. दही, काळे मीठ, मिरी आणि जिरे हे मिश्रण वजन कमी करण्यासाठी बेस्ट आहे. यामुळे अधिकचे फॅट बर्न होते. 


४. दही, साखर आणि ड्रायफ्रुट्स एकत्रित  खाल्ल्याने अशक्तपणा दूर होतो. वजन वाढण्यास मदत मिळते.


५. दही आणि ओवा मिसळून खाल्ल्याने पाईल्सचा त्रास दूर होतो.


६. दही आणि भात एकत्रित खाल्ल्याने अर्ध डोकेदुखी बरी होते. 


७. दह्यात बडिशेप आणि साखर मिसळून खाल्ल्याने पोटातील जळजळ दूर होते. निद्रानाशेचा त्रास कमी होतो.