मुंबई : जेवणानंतर मुखवास म्हणून सर्रास अनेक घरांमध्ये बडिशेप खाल्ली जाते. मात्र छोट्या आकाराची बडिशेप तुमच्या आरोग्यासाठीही चांगली आहे. यामुळेच शरीराला अनेक फायदे होतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बदाम, बडिशेप आणि खडीसाखर समान प्रमाणात घेऊन वाटा. रोज रात्री आणि दुपारी जेवल्यानंतर याचे सेवन केल्यास स्मरणशक्ती वाढते. 


रिकाम्या पोटी बडिशेप खाल्ल्यास रक्त शुद्ध होते. 


मासिक पाळी अनियमित असल्यास बडिशेपचे सेवन करा. यामुळे फायदा होतो. 


मुख दुर्गंधीचा त्रास असेल तर नियमितपणे बडिशेपचे सेवन करा. दिवसातून तीन ते चार वेळा बडिशेपचे सेवन केल्यास मुखदुर्गंधीची समस्या दूर होते. 


अपचनाचा त्रास जाणवल्यास दोन कप उकळत्या पाण्यात एक चमचा बडिशेप टाका. याचे सेवन केल्यास अपचनाचा त्रास दूर होतो.