मुंबई : अननस या फळामध्ये  'क' जीवनसत्त्व, पोटॅशियम, ब्रोमोलिन, कॅरोटिन हे घटक असतात. त्यामुळे काही त्वचा रोगांवर अननसाचा रस नियमितपणे सेवन केला असता त्वचारोग बरे होतात आणि श्रमनाशक असते.  लहान मुलांना जर ताप आला असेल तर तो कमी करण्यासाठी अननसाचा रस आणि पिंपळीचे चूर्ण मधामधून चाटावयास द्यावे.  पित्ताचे विकार कमी करण्यासाठी अननसाचा मुरंबा तसेच अननस सरबत यांचा आहारामध्ये नियमित वापर करावा.


अननसाचा ज्यूस पिण्याचे फायदे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अननसाच्या रसात ब्रोमोलिन नावाचे तत्व असते. ज्यामुळे पोटाच्या आजारांपासून सुटका मिळते. या रसाने पोट फुगण्याच्या समस्या दूर होतात. या ज्यूसमध्ये एन्झाईम्स असते जे प्रोटीन डायजेस्ट करण्यात मदत करतात.


अननसाच्या रसात कमी कॅलरी असतात. याच्या नियमित सेवनाने वजन कमी होते. 


अननसामध्ये व्हिटामिन अँटी ऑक्सिडंट आणि व्हिटामिन ए डोळ्याच्या आरोग्यासाठी चांगले असते. अननसाचा रस नियमित प्यायल्याने डोळ्यांचे आजार दूर होतात.


अननसाच्या रसात आढळणारे व्हिटामिन सी आणि पोटॅशियम त्वचेसाठी उपयुक्त असते. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स, काळे डाग दूर होतात. 


अननसामध्ये बीटा कॅरोटीन आणि व्हिटामिन एचे प्रमाण अधिक असते. हा रस प्यायल्याने अस्थमाचा धोकाही कमी होतो.


अननसाच्या रसाच्या नियमित सेवनाने आर्थाराईट्समुळे होणारा त्रास आणि सूज कमी होते.