मुंबई : उन्हाळा सुरू होताच प्रत्येकजण आंब्याची आतुरतेने वाट पाहतो. उन्हाळा कितीही त्रासदायक, कंटाळवाणा वाटला तरी आंब्यासाठी तो हवाहवासाही वाटतो. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांच्या आठवणीत प्रत्येकाची आंब्याची एक आठवण नक्कीच असेल. आंब्याच्या विविध पदार्थांचा आस्वाद आपण घेऊ शकतो. मॅँगो शेक, पन्हे, आमसर, चटणी इत्यादी. त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे आंबा आरोग्यदायी आहे. त्याचे अनेक फायदे असले तरी अति खाण्यामुळे नुकसानही होऊ शकते. तर जाणून घेऊया आंबा खाण्याचे फायदे अन् तोटे...


फायदे


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    आंब्यात व्हिटॉमिन ए, आयर्न, कॉपर आणि पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक घटक असतात. उन्हाळ्यात आंबा खाणे फायदेशीर ठरते.

  • आंब्यात शर्करा असल्याने आंब्यापासून शरीरास ऊर्जा मिळते. त्यामुळे तुम्हाला अॅक्टीव्ह वाटते. उन्हाळ्यात आंबा खाण्याऐवजी मॅंगो शेक किंवा कैरीचे पन्हे घेणे अधिक फायदेशीर ठरेल.

  • आंब्यात व्हिटॉमिन सी भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याचबरोबर चेहऱ्यावरची चमक वाढते आणि सुरकुत्या कमी होतात. आंब्यात फायबर्सही मुबलक असतात. 


तोटे


  • एका मध्यम आकाराच्या आंब्यात सुमारे १५० कॅलरीज असतात. त्यामुळे आंब्याच्या अधिक सेवनानेमुळे वजन वाढण्याची शक्यता असते.

  • जेवल्यानंतर आंबा खाल्याने कॅलरीजचे प्रमाण अधिक वाढते. त्यामुळे सकाळी, संध्याकाळी नाश्ता, स्नॅक्स म्हणून आंबा खाणे जास्त फायदेशीर ठरेल. त्यामुळे कॅलरीजही नियंत्रित राहतील.

  • अधिक प्रमाणात आंबा खाल्याने शरीरात उष्णता वाढते. त्यामुळे जास्त प्रमाणात आंबा खाऊ नका. एका दिवसात एक किंवा दोनपेक्षा अधिक आंबा खाणे टाळा. आंबा कोणाला आवडत नाही. आंबा न आवडणारी व्यक्ती दुर्मिळच असेल. मात्र आंबा कितीही चविष्ट असला तरी त्याचे अति सेवन टाळणे आरोग्याच्या दृष्टीने चांगले ठरेल.