मुंबई : हे सर्वांनाच माहिती आहे की, कापूराचा वापर होम हवन, पूजा आणि अनेक ब्यूटी प्रॉडक्ट्समध्ये थंडाई म्हणून केला जातो. यासोबतच कापूराचे आणि कापूराच्या तेलाचे अनेक चमत्कारीक फायदेही आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चीन आणि भारतात अनेक वर्षांपासून कापूराचा वापर आजारांवर उपचार करण्यासाठी आणि धार्मिक कामांसाठी केला जातो. कापूराचे फायदे अने आहेत पण, जास्त करून लोक कापूराचा वापर पूजेत जाळण्यासाठीच करतात. पण कापूरात अनेक औषधी गुण असतात हे अनेकांना माहितच नाहीत. याने अनेक रोगांपासून मुक्ती मिळू शकते. चला जाणून घेऊया कापूराचे असेच अनेक फायदे....


कापूराचे आरोग्यदायी फायदे


- शरीरावर खाज आल्याने कापूर खोब-याच्या तेलात मिक्स करून शरीरावर लावल्यास आराम मिळतो. 


-  कापूर ऑयली स्किनसाठी खूप फायद्याचा ठरतो. कापूर आणि ग्लिसरीन मिक्स करून लावल्यास पिंपल्स निघून जातात आणि चेहरा ताजातवाणा दिसतो. 


- जळालं असेल किम्वा कापलं असेल तर खोब-याच्या तेलात कापूर टाकून लावल्यास आराम मिळतो. याने जळाल्यावर होणारी जळजळ कमी होते. 


- कापूराचा उपयोग सर्दी खोकला कमी करण्यासाठीही केला जाऊ शकतो. 


- खोब-याच्या तेलात कापूर टाकून केसांना लावल्यास केस गळणे कमी होते.