मुंबई : कोरफड बहुगुणी असल्याचे आपण सर्वच जाणतो. कोरफड सौंदर्यवर्धक असण्याबरोबर आरोग्यदायी ही आहे. केस, त्वचा यासाठी वरदान ठरणाऱ्या कोरफडीची आरोग्यदायी फायदे आर्श्चयचकीत करणारे आहेत. कोरफडच्या सेवनाने आपण आरोग्याच्या अनेक समस्या दूर करु शकतो. कोरफडीचे अनेक फायदे तुम्हाला माहित असतील पण कोरफडीचा ज्यूसही अत्यंत आरोग्यदायी आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का? त्यात मॅग्नेशियम, झिंक, लोह, कॅल्शियम, पोटॅशियम आणि सेलेनियम यांसारखी खनिजे असल्याने शरीराला पोषक घटकांचा पुरवठा होतो. त्यामुळे तुम्ही दररोजच्या आहारात कोरफडीच्या रसाचा समावेश केला पाहिजे. रोज कोरफडीचा ज्यूस घेणे या समस्यांवर फायदेशीर ठरेल. तुम्हाला आहेत का या समस्या? मग हा उपाय नक्की करुन पहा...


डोकेदुखीवर आराम


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वारंवार डोकेदुखीचा त्रास होत असल्यास रोज कोरफडीचा ज्यूस रिकाम्या पोटी घ्या. असे केल्याने डोकेदुखीवर आराम मिळेल.


बद्धकोष्ठतेची समस्या होईल दूर


पोट नीट साफ होत नसल्यास कोरफडीचा ज्यूस घेणे फायदेशीर ठरेल. रोज सकाळी रिकाम्या पोटी कोरफडीचा ज्यूस घ्या पोट साफ होण्यास मदत होईल. हा उपाय नियमित केल्यास बद्धकोष्ठतेची समस्याही दूर होईल.


शरीरातील विषद्रव्ये दूर करण्यास मदत


अयोग्य वेळी जेवणे, अनहेल्दी फूड खाणे या सर्व सवयींमुळे शरीरात विषद्रव्ये तयार होतात. त्यामुळे पोटाच्या आणि त्वचेच्या समस्या उद्भवतात. कोरफडीचा ज्यूस घेतल्याने शरीर डिक्टॉक्सीफिकेशनची प्रक्रिया सुरु होते. परिणामी शरीरातील सर्व विषद्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. 


भूक न लागण्याची समस्या दूर होईल


भूक लागत नसल्यास रोज सकाळी कोरफड ज्यूस पिण्यास सुरुवात करा. हा एक रामबाण उपाय आहे. याच्या सेवनाने भूक न लागण्याची समस्या दूर होईल.


दातांसंबंधित समस्यांवर उपायात्मक


कोरफडीत अॅंटी मायक्रोवाईल असतात. जे दात साफ ठेवण्यास मदत करतात. त्याचबरोबर दातात होणारे बॅक्टेरिअल इंफेक्शन दूर राहते.