मुंबई :  अनेक आजारांवर मात करण्यासाठी आजकाल योगाभ्यास हा औषाधांसोबतच फायदेशीर आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनुलोमविलोम हा त्यापैकी एक आहे.  फुफ्फुसांच्या कार्याला चालना देण्यासाठी अनुलोमविलोम फायदेशीर आहे. 


कसे कराल अनुलोमविलोम ? 


अनुलोमविलोम करताना एका नाकपुडीने श्वास आत घेतला जातो. त्यानंतर काही सेकंदामध्ये दुसअर्‍या नाकपुडीतून श्वास परत बाहेर सोडा. नियमित तुम्हांला झेपेल त्या वेगाने अनुलोमविलोम  करावे. सुरूवातीला सकाळी पाच वेळेस अनुलोमविलोम करावे. हळूहळू तुमचा वेग वाढवा.   


अनुलोमविलोम  करण्याचे फायदे - 


आरामदायी झोप 


आजकाल दगदगीची जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या वेळा बिघडल्याने अनेकांना निद्रानाशाचा त्रास होतो. यावर मात करण्यासाठी अनुलोम विलोम करणं फायदेशीर ठरतं 


त्वचेचे सौंदर्य खुलतं 


त्वचा सतेज करण्यासाठी तुमच्या आहारात, व्यायामात बदल करणं आवश्यक आहे. अनुलोमविलोम केल्याने रक्तातील  घातक घटकांचा परिणाम आटोक्यात ठेवण्यासाठी मदत होते.  अ‍ॅक्ने, ब्रेकआऊटचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी मदत होते.  


अंगदुखी 


विनाकारण शरीरातील  मरगळ जाणवणं, शीण जाणवणं टाळण्यासाठी अनुलोम विलोम फायदेशीर ठरते. शरीरातील रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेला चालना मिळते. परिणामी गळल्यासारखे वाटत असल्यास हा त्रास आटोक्यात राहण्यास मदत होते.  


मायग्रेन  


श्वसनविकारांवर मात करण्यासाठी अनुलोमविलोम अत्यंत फायदेशीर आहे. सायनस, मायग्रेनचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी नियमित काही वेळ अनुलोमविलोमाचा अभ्यास करा.  


मूड स्विंग  


सतत मनात चंचलता निर्माण होत असल्यास त्याचे परिणाम तुमच्या कामावरही होतो. कामामध्ये एकाग्रता वाढवण्यासोबतच मूड स्विंगमुळे विनाकारण ताण वाढतो. त्यामुळे आरोग्य बिघडू शकते.