मुंबई : कडक उन्हाळा सुरु झालाय. उन्हाच्या या काहिलीपासून वाचण्यासाठी थंडगार सरबात पिणे सर्वच पसंत करतात. या ऋतूत स्वत:ला ताजेतवाने आणि फिट ठेवण्यासाठी विविध प्रकारचे ज्यूस आणि थंड पेयांचे सेवन तुम्ही करत असाल मात्र यातच बेलाचा तुमच्या शरीरासाठी उपयुक्त ठरु शकतो. बेलाच्या प्रयोगाने सौदर्य तर उजळतेच मात्र आरोग्यही चांगले राहते. बेलाचा रस आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. उन्हाळ्याच्या दिवसाचा दररोज एक ग्लास बेलाचा रस प्यायल्यास त्याचा परिणाम काही दिवसांतच तुम्हाला शरीरावर दिसू लागेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उन्हाळ्यात लघवीचा त्रास होत असेल तर बेलाचा रस प्यावा. 


बदलत्या जीवनशैली आणि ऑफिसमध्ये अनेक तास बसून राहिल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास सतावतो. कमी वयात लोकांना ही समस्या सतावतेय. यावर जर दररोज बेलाचा रस प्यायल्यास गॅस, बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास दूर होतो.


जर एखाद्याला कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असेल तर बेलाच्या रसाच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित होते. 


ज्यांना हृदयासंबंधित रोगांचा त्रास आहे अशा व्यक्तींनी दररोज बेलाचा रस प्यावा. या रसात एक ते दोन थेंब तूप मिसळावे. 


तोंड आल्यास बेलाचा रस प्यावा. 


रक्त साफ नसल्यास अनेक समस्या निर्माण होतात. यावर बेलाचा रस प्यावा याने अनेक फायदे होतात.