मुंबई : नवजात बाळासाठी असलेले आईच्या दूधाचे महत्त्व आपण सर्वच जाणतो. पण स्तनपान करणे मातेच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. याची कदाचित तुम्हाला माहिती नसेल. स्तनपान करणाऱ्या महिला निरोगी राहतात, असे दिसून आले आहे. जाणून घेऊया स्तनपान करण्याचे फायदे...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

# स्तनपान केल्याने प्रेग्नेंसीनंतर उद्भवणाऱ्या समस्यांपासून सुटका मिळते. तणाव, रक्तस्त्राव या समस्यांवर लवकर नियंत्रण मिळवता येते.


# स्तनपान केल्याने स्तन आणि गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचा धोका खूप प्रमाणात कमी होतो.


# स्तनपान केल्याने रक्ताची कमतरता म्हणजेच अॅनेमिया सारख्या आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते.


# आई आणि बाळाचे नाते भावनिकरीत्या घट्ट होते. बाळ आपल्या आईला खूप लवकर ओळखायला लागते.


# स्तनपान करताना अधिक कॅलरीज वापरल्या जातात. यामुळे नैसर्गिकरित्या वजन कमी होते आणि जाडेपणापासून सुटका होण्यास मदत होते.


# त्याचबरोबर स्तनपान करणे हे नैसर्गिक गर्भनिरोधक आहे.