मुंबई : भारतीय खाद्यसंस्कृतीचं एक प्रमुख वैशिष्ट्य मसाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लवंग हा मसाल्याच्या पदार्थामधील एक जिन्नस आहे. मसाल्याप्रमाणे काही गोडाच्या पदार्थांमध्येही लवंग वापरली जाते. तिखट चवीची लवंग आरोग्याला फायदेशीर आहे. रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळणंदेखील आरोग्याला फायदेशीर ठरते.


 अधिक वाचा सर्व त्वचाविकारांवर एक उपाय लवंग तेल


लवंगाचे आरोग्यदायी फायदे -: 


हिवाळ्याच्या दिवसात रात्री झोपण्यापूर्वी एक लवंग चघळल्यास शरीरात उष्णता निर्माण होण्यास मदत होते. सोबतच शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते. 


रक्तामध्ये विषारी घटक असतत. त्यांना नैसर्गिकरित्या बाहेर टाकण्यासाठी लवंग फायदेशीर ठरते. रक्त शुद्ध झाल्याने अनेक त्वचाविकारापासून सुटका होते. 


लवंगाचा चहा पिण्याचे भरपूर फायदे


नियमित लवंग चघळल्याने दातांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. दातदुखी होत असल्यास लवंग दाताखाली पकडून त्यामधील अर्क तोंडाचे आरोग्य सुधारते. 


पोटाचे अनेक विकार, समस्या आटोक्यात ठेवण्यासाठी लवंग फयादेशीर ठरते. त्यामुळे आहारात किंवा झोपण्यापूर्वी लवंग चघळा.