मुंबई : अनेकजण दूधाच्या नावाने तोंड मुरडतात. पण दूध हे पूर्णान्न असून आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. थंड दूध प्यायल्याने अॅसिडिटी, स्थूलता, सारखी भूक लागणे यांसारख्या छोट्या मोठ्या समस्या दूर होतात. त्याचबरोबर थंड दूध पिण्याचे अनेक फायदे आहेत. तुम्हीही जाणून घ्या काय आहेत फायदे....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१. थंड दूध प्यायल्याने शरीराला ते नॉर्मल तापमानाला येण्यासाठी कॅलरीज बर्न कराव्या लागतील आणि त्यानंतर त्याचे पचन होईल. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होईल.


२. कोमट दूध प्यायल्याने झोप येते. कारण दूधात अमिनो अॅसिड ट्रिप्टोफन असते. पण थंड दूधामुळे हा त्रास होत नाही. उलट दूधातील पोषकघटक मिळतील.


३. अॅसिडिटी क्षमवण्यासाठी आणि पेप्टिक अल्सरमुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी थंड दूध पिणे फायदेशीर ठरते.


४. जेवल्यानंतरही तुम्हाला सारखी भूक लागत असेल तर तुम्ही थंड दूध पिणे हा उत्तम उपाय आहे. थंड दूधात ओट्स मिसळूनही तुम्ही खावू शकता.


५. थंड दूधात इलेक्ट्रोलाईट्स असतात. त्यामुळे डिहाड्रेशनपासून बचाव होतो. दिवसातून दोनदा थंड दूध प्यायल्यास तुम्ही नेहमी हाडड्रेट रहाल. दूध पिण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे सकाळची.


६. थंड दूधामुळे गॅस होत नाही. अन्नपचनास मदत होते. यामुळे फॅट्स, तूप आणि तेल याचे चांगले पचन होते. 


७. व्यायामानंतर थंड दूध पिणे लाभदायी ठरते. यात मसल्ससाठी आवश्यक प्रोटीन्स असतात. तसंच दूधामुळे शरीराला ऊर्जा मिळते.


८. चेहऱ्यावर थंड दूध लावल्याने त्वचा स्वच्छ होते. तसंच त्वचा हाडड्रेट आणि मुलायम होते.