नवी दिल्ली : सायकलिंग हा व्यायामाचा उत्तम प्रकार आहे. त्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. वजन नियंत्रण राहते. तुम्ही तंदुरुस्त आणि फिट राहता. त्याचबरोबर अनेक मानसिक लाभ देखील मिळतात. तणाव, चिंता कमी होते. जाणून घेऊया सायकलिंगचे फायदे:


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    सायकलिंग एक एरोबिक व्यायामप्रकार आहे. ज्यामुळे हृद्यविकारचा धोका कमी होतो. त्याचबरोबर मेंदूत सिरोटोनिन, डोपामाईन व फेनिलइथिलामीन यांसारख्या रसायनांची निर्मीती अधिक प्रमाणात होऊ लागते. त्यामुळे ताण दूर होऊन तुम्हाला आनंदी वाटू लागते.

  • नियमित सायकलिंग केल्यास घोटे व गुडघे यांची दुखणी कमी होऊन आराम मिळतो.

  • मधुमेह असणाऱ्यांनी सायकलिंग करताना योग्य प्रमाणात पाणी प्यावे. टाईप-१ मधुमेह असणाऱ्यांनी एका तासाहून अधिक सायकल चालवल्यास कार्बोहाइड्रेट युक्त आहार घ्यावा.

  • तसंच मधुमेही लांब पल्याचा प्रवास सायकलवरून करणार असल्यास त्यांनी व्यायामाला सुरुवात करण्यापुर्वी आणि त्यानंतरही रक्तातील साखरेची पातळी तपासून घ्यावी. यासाठी तुम्ही फिंगर स्टिक स्टाईल ब्लड ग्लूकोज मीटर वापरू शकता. 

  • सायकलिंग केल्याने आरोग्यास अनेक फायदे मिळतील. घोटे, पायांना चांगला व्यायाम मिळेल. तसंच धावण्याच्या तुलनेत घोट्यांवर कमी दबाव पडेल आणि पायांच्या पेशींचा उत्तम व्यायाम होईल.