रात्री झोपताना दालचिनीचं दूध पिण्याचे आरोग्यदायी फायदे !
तिखट गोड चवीची दालचिनी पदार्थांची लज्जत वाढवते.
मुंबई : तिखट गोड चवीची दालचिनी पदार्थांची लज्जत वाढवते. त्याचाप्रमाणेच दालचिनीचा आहारात समावेश केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. दालचिनीमध्ये अॅन्टिऑक्सिडंट, व्हिटॅमिन आणि मिनरल घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे अनेक आजारांना दूर ठेवण्यास मदत होते.
दूधासोबत दालचिनी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. चमचाभर दालचिनीमध्ये 19 कॅलरीज, झिरो फॅट्स, शुगर आणि प्रोटीन घटक असतात. सोबतच यामध्ये 68 % मॅग्नीज, कॅल्शियम,आयर्न आणि व्हिटॅमिन के घटक आढळतात.
दालचिनीचं दूध पिण्याचे फायदे
रोगप्रतिकारक्षमता सुधारते -
दालचिनीच्या दूधामुळे शरीराची रोगप्रतिकारक्षमता सुधारते. यामुळे ऋतूमानात झालेल्या हलक्या बदलामुळे होणारे आजार दूर राहतात. सोबतच थकवा दूर राहतो.
एन्टी एजिंगचा धोका कमी -
वाढत्या वयानुसार त्वचा निसतेज होणं, सुरकुत्या पडणं हा त्रास जाणवतो. मात्र दालचिनीच्या दूधाने मात्र हा त्रास आटोक्यात राहतो.
हृद्यरोगींना फायदेशीर -
दालचिनीच्या दूधामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. यामुळे हृद्यरोगींमधील ब्लॉकेजेस होण्याचा धोका आटोक्यात राहण्यास मदत होते.
वजन घटवणयास मदत करते-
मेटॅबॉलिझमला चालाना देण्यासोबत , फॅट्स बर्न करण्याची क्षमता या दूधात असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
त्वचेचं सौंदर्य खुलवते -
अॅन्टी फंगल आणि अॅन्टी बॅक्टेरियल गुणधर्म असल्याने त्वचेचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. अॅक्ने, ब्रेकआऊट्सचा त्रास आटोक्यात ठेवण्यास हे दूध मदत करते.
शांत झोप येण्यास मदत -
निद्रानाशाचा त्रास असणार्यांमध्ये दालचिनीचं दूध उत्तम उपाय आहे. यामुळे मेंदूचा थकवा कमी होतो सोबतच शांत झोप मिळण्यास मदत होते.
मधुमेहींना फायदेशीर -
मधूमेहींमध्ये रक्तातील साखरेचं प्रमाण कमी जास्त होऊ नये म्हणून दालचिनीची दूध प्यावे.