मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात जसे आंबे, फणस खाल्ल्याचा मोह अनेकांना आवरत नाही त्याचप्रमाणे कडक उन्हात आईस्क्रिमची चव चाखणं अनेकांना आवडते. अधिक आईस्क्रिम खाल्ल्यास सर्दी, खोकल्याचा त्रास होतो असे सांगत लहान मुलांना आईस्क्रिम खाण्यापासून दूर केले जाते परंतू प्रमाणात आईस्क्रिम खाल्ल्यास आरोग्याला फायदादेखील होतो हे तुम्हांला ठाऊक आहे का ? 


 आरोग्यदायी आईस्क्रिम   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 आईस्क्रिम हे आरोग्यदायी असल्याचे काही संशोधनातून समोर आले आहे. हावर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ रिसर्चच्या अहवालानुसार आईस्क्रिममध्ये नाइसिन, थाइमिन आणि व्हिटामिन A,D,B हे घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्यामुळे प्रमाणात आईस्क्रिमचे सेवन केल्यास आरोग्याला त्याचा फायदा होऊ शकतो. 
 
 कॅल्शियम - आईस्क्रिममध्ये व्हिटॅमीन डी मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे शरीरात कॅल्शियमचे शोषण उत्तमप्रकारे होण्यास मदत होते. 
 
डोळ्यांसाठी फायदेशीर - आईस्क्रिममधील व्हिटॅमिन ए डोळ्यांच्या आरोग्याला फायदेशीर ठरते. 


उर्जा स्त्रोत - आईस्क्रिममध्ये कार्ब्स, फॅट्स आणि प्रोटीन हे घटक मुबलक प्रमाणात असतात. यामुळे शरीराला उर्जा मिळते.  


रक्ताचा प्रवाह सुधारतो - आईस्क्रिममधील व्हिटॅमिन के शरीरातील रक्ताचा प्रवाह सुधारण्यास मदत करतो. 


मेटॅबॉलिझम - आईस्क्रिममध्ये बी 6 व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात असल्याने शरीरातील मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. 


स्मरणशक्ती तल्लख - आईस्क्रिममध्ये बी 12 व्हिटॅमिन असल्याने स्मरणशक्ती तल्लख राहण्यास मदत होते. 


वजन घटवणं -  वजन घटवण्यसाठी आईस्क्रिम मदत करते. आईस्क्रिम थंड स्वरूपाचे असते. त्याला सामान्य स्थितीमध्ये आणण्यासाठी शरीराला मेहनत घ्यावी लागते. यामुळे वजन घटवण्यास मदत होते. 


अ‍ॅसिडीटीचा त्रास कमी करण्यासाठी व्हेनिला आईस्क्रिम मदत करते. व्हेनिला आईस्क्रिम हे कोणतेही प्रिझर्व्हेटीव्ह न मिसळाता, घरच्या घरी किंवा शुद्ध स्वरूपात बनवलेले असेल तर त्यामुळे अ‍ॅसिडीटीचा त्रास कमी होण्यास मदत होते.