कच्चा कांदा खाण्याचे आर्श्चयकारक फायदे...
आपल्या स्वयंपाकघरातील प्रत्येक पदार्थ आरोग्यदायी आहे, हे आपण जाणतोच.
मुंबई : आपल्या स्वयंपाकघरातील प्रत्येक पदार्थ आरोग्यदायी आहे, हे आपण जाणतोच. कांदा डोळ्यांना झोंबत असला तरी अत्यंत आरोग्यदायी आहे. त्यासाठी कच्च्या कांद्याचा आहारात समावेश करा. कांदा खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे...
कांद्याचा रस पिणे किंवा त्याने तळवांना मालिश करणे खूप फायदेशीर आहे. कच्चा कांदा खाल्याने केस लांबसडक होण्यास मदत होते. त्याचबरोबर कांद्याचा रस स्कॉल्फला लावा आणि तासाभरानंतर कोमट पाण्याने केस धुवा.
काद्यांतील पोषकतत्त्व कन्सर सारख्या गंभीर आजारांना प्रतिबंध करतात. त्याचबरोबर त्वचा विकार दूर होण्यास मदत होते.
रक्तदाब असणाऱ्यांसाठी कांदा एक वरदान आहे. यामुळे बीपी नियंत्रित राहतो. त्यामुळे जेवताना कच्चा कांदा जरुर खा.
कच्चा कांद्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते.
स्टोन असणाऱ्यांसाठी कांद्याचे सेवन फायदेशीर ठरते. त्यासाठी रोज रिकाम्या पोटी कांद्याचा रस घ्या.
केसगळती ही आजकालची सामान्य समस्या आहे. पण याचा उपाय तुमच्या स्वयंपाकघरातच आहे. कच्चा कांद्याचा रस केसांना लावल्यास केसगळती दूर होते.
कांद्यात फास्फोरिक अॅसिड असते. त्यामुळे रक्त शुद्ध होण्यास मदत होते. नसांचे दुखणे असल्यास दुखत असलेल्या ठिकाणी कांद्याच्या रसाने मालिश करा. असे महिनाभर केल्याने ही समस्या दूर होण्यास मदत होईल.