मुंबई : भारतीय मसाले हे आपल्या खाद्यसंस्कृतीचं खास वैशिष्ट्य आहे. अनेकजण लसणाशिवाय त्याच्या जेवणाचा विचारच करू शकत नाही. भाज्यांमध्ये, फोडणीमध्ये किंवा अगदी किमान चटणीच्या माध्यमातून अनेकजण आहारात लसणाचा समावेश करतात.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसणाचे अनेक आरोग्यदायी फायदे तुम्हांला ठाऊक असतील  पण लसणाइतकीच त्याची सालही फायदेशीर आहे हे तुम्हांला ठाऊक आहे का? लसणाप्रमाणेच आल्याचा तुकडा चघळण्याचे '8' आरोग्यदायी फायदे !


लसणाच्या सालीचे फायदे 


#1 लसणाच्या साली पाण्यात उकळून त्या पाण्याने केस धुतल्याने केसगळतीची समस्या आटोक्यात राहण्यास मदत होते.  केसगळतीच्या समस्येमागे तुमच्या या '7' चूका कारणीभूत


#2 चेहर्‍यावरील मुरूमांचा त्रास तुमची डोकेदुखी बनत आहे का ? मग हा उपाय तुमचा त्रास कमी करायला मदत करणार आहे. लसणाच्या सालांचीही पेस्ट बनवा. ही पेस्ट पिंपल्सवर लावल्याने त्रास आटोक्यात राहण्यास मदत होईल.  या '3' घरगुती उपायांंनी रातोरात हटवा पिंपलचा त्रास


#3 पाण्यामध्ये लसणाच्या साली मिसळा. हे पाणी उकळा. थोडे कोमट झाल्यानंतर या पाण्यात पाय ठेवून बसा. यामुळे पायावरील सूज कमी होण्यास मदत होईल.  


#4 सर्दी - खोकल्याचा त्रास असल्यास काढयामध्ये लसणाप्रमाणेच लसनाचीसालं ही मिसळू शकता. पाण्यात केवळ लसणाची साल मिसळून पाणी उकळा. उकळलेले  पाणी गाळून प्यायल्यास सर्दी- खोकला, घशातील खवखव कमी होण्यास मदत होईल.  


#5 लसणाची साल अस्थमाच्या रूग्णांसाठीही फायदेशीर आहे. लसणाच्या सालीची पेस्ट मधामध्ये मिसळून त्याचे सेवन करणे आरोग्याला फायदेशीर ठरते. ७ फायदे लसूण आणि मध एकत्र मिक्स करून खाण्याचे...