रोज सकाळी खा लसणाची एक पाकळी आणि....
साधारणपणे भारतीय खाद्यपदार्थांमध्ये लसूण आर्वजून वापरले जाते.
नवी दिल्ली : साधारणपणे भारतीय खाद्यपदार्थांमध्ये लसूण आर्वजून वापरले जाते. डाळीला, भाजीच्या फोडणीला, चटणीला लसूण वापरले जाते. स्वाद वाढवण्यासाठी लसूण आवश्यक आहे. मात्र त्याचबरोबर लसणाचे अनेक फायदे देखील आहेत. खासकरून पुरूषांना मिळणारे फायदे अधिक आहेत. तर मग जाणून घेऊया लसूण खाण्याचे फायदे....
लसूण खाण्याचे फायदे:
लसणाने शरीरातील विषारी घटक दूर होण्यास मदत होते. म्हणजेच पोट साफ होते.
लसूण खाल्याने पोटासंबंधीच्या समस्या उद्भवण्यास आळा बसतो. त्याचबरोबर बॅक्टरिया नष्ट होण्यास मदत होते.
उच्च रक्तदाब असल्यास रिकाम्या पोटी लसूण खाणे फायदेशीर ठरेल.
लसणाच्या सेवनाने रक्ताभिसरण योग्य पद्धतीने होते आणि त्याचबरोबर हृदयासंबंधीत आजार होण्याचा धोका कमी होतो.
कोलेस्ट्रॉलची समस्या असल्यास लसूण खाणे फायदेशीर ठऱते. त्यामुळे कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते.
त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
पुरूषांसाठी होणारे फायदे:
लसणात सेलेनियम असते. त्यामुळे इन्फर्टीलीची समस्या उद्भवत नाही.
यात असलेल्या अंन्टी बॅक्टेरियल गुणधर्मांमुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते.
यात प्रोटीन असल्याने मसल्स टोन होतात.
लसणातील कार्बोहाइड्रेट्समुळे अशक्तपणा कमी होऊन शरीराला ऊर्जा मिळते.
कॅल्शियम असल्याने हाडांना बळकटी येते.
एलिसिनमुळे फॅट्स जलद गतीने बर्न होतात. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
यातील फायबर्समुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.