टरबुजाच्या बिया खाण्याचे फायदे
उन्हाळ्यात टरबूज मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढण्याचे काम करतात. टरबूज खाण्याचे अनेक फायदे आहेतच मात्र त्याचबरोबर टरबुजाच्या बिया अर्थात मगजचेही अनेक फायदे आहेत.
मुंबई : उन्हाळ्यात टरबूज मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढण्याचे काम करतात. टरबूज खाण्याचे अनेक फायदे आहेतच मात्र त्याचबरोबर टरबुजाच्या बिया अर्थात मगजचेही अनेक फायदे आहेत.
१. टरबुजाच्या बियांमध्ये पोटॅशियम असते ज्यामुळे ब्लडप्रेशर कमी होण्यास मदत होते. तसेच हृद्य निरोगी राहते.
२. टरबुजाच्या बियांमध्ये व्हिटामिन ए आणि बीटा कॅरोटिनसारखी तत्वे असतात. ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.
३. टरबुजाच्या बियांमध्ये प्रोटीनचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे नखे आणि केसांची वाढ चांगली होते.
४. टरबुजाच्या बियांमध्ये व्हिटामिन सी अशते ज्यामुळे रक्तातील पांढऱ्या पेढी वाढतात यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढते.
५. या बिया शरीरातील ऑक्सिजनचा फ्लो वाढवतात ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते.
६. ज्यांना सतत अॅसिडिटीचा त्रास होत असेल वा पचनाचा त्रास असेल त्यांच्यासाठी टरबुजाच्या बिया फायदेशीर आहेत.