मुंबई : इंफेक्शनमुळे किंवा चोंदलेल्या नाकामुळे थंडीत कानदुखीची समस्या वाढते. अशावेळी कानात मळ साचून राहतो. हा त्रास होत असल्यास अनेकजण बाहेर फिरताना स्कार्फ घालतात किंवा इअर बर्डस वापरतात. पण वेदना खूपच वाढल्यास पेनकिलर घेण्याऐवजी 'निलगिरीचे तेल' नक्की वापरा.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कसे आहे तेल फायदेशीर ? 


निलगिरीच्या तेलामध्ये अ‍ॅन्टीसेप्टीक तसेच अ‍ॅन्टिबॅक्टेरियल गुणधर्म असतात. इंन्फेक्शन वाढवणार्‍या बॅक्टेरियांचा नाश करण्यासाठी निलगिरीचे तेल उपयुक्त ठरते.तसेच वेदना कमी करण्यासही मदत होते. सोबतच सर्दी-पडशाचा त्रास, श्वसनाच्या विकारांपासून आराम मिळतो. नाक चोंदल्याने होणारी कानदुखी कमी करण्यासही निलगिरीचे तेल फायदेशीर ठरते.  


मग कसे वापराल निलगिरीचे तेल - 


मसाज : 


कानाच्या बाहेरील भागावर निलगिरीच्या तेलाने मसाज केल्याने रक्तप्रवाह सुधारतो. तसेच वेदना कमी होण्यास मदत होते. तसेच कानात साचलेला मळ मोकळा होण्यासही मदत होते. मात्र त्यासोबत खोबरेल तेल मिसळून मानेकडे खालच्या बाजूला मसाज करा.


वाफ घेणे :


सर्दीमुळे किंवा नाक चोंदल्याने कान दुखत असल्यास वाफ घेणे अधिक फायदेशीर ठरते. यासाठी गरम पाण्यात 4-5 निलगिरीच्या तेलाचे थेंब टाका. डोकं जाड चादरीने किंवा टॉवेलने झाका. हळूहळू श्वास घ्या. श्वास घेताना नाक मोकळे होईल. परिणामी कानदुखीचा त्रासही कमी होतो.