मुंबई : भारताला मधूमेहाची राजधानी समजली जाते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मधूमेह हा आजार अनुवंशिक असल्याने त्यावर नियंत्रण ठेवणं कठीण होऊन बसलं आहे. अनुवंशिकतेने जसा मधूमेह एका पिढीतून दुसर्‍या पिढीत जातो. तसाच तो तणावग्रस्त जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या बदलत्या सवयी यामुळेदेखील गंभीर झाला आहे. 


शरीरात इन्सुलिनच्या निर्मितीचं कार्य बिघडलं की रक्तातील साखरेच्या पातळीमध्येही चढ-उतार होण्यास सुरूवात होते. परिणामी मधूमेहाचा धोका वाढला आहे. मग औषधोपचारासोबतच आहारात काही सकारात्मक बदल केल्यास मधूमेहाच्या रुग्णांना फायदेशीर आहे. 


केळ्याची भाजी  


मधूमेहींसाठी कच्ची केळी अत्यंत फायदेशीर आहेत. पिकलेल्या केळ्यांचे अनेक आरोग्यदायी गुणधर्म तुम्हांला ठाऊक असतील. त्यापासून अनेक पदार्थ तुम्ही बनवले असतील,चाखले असतील. परंतू कच्ची केळीदेखील फायदेशीर आहेत हे ठाऊक आहे का? 



कच्च्या केळ्यातील आरोग्यदायी गुणधर्म 


कच्च्या केळ्यामध्ये पोटॅशियम घटक, विटामिन बी6, विटामिन सी मुबलक असल्याने नर्व्ह सिस्टिमचं पोषण होतं. रक्तातील साखरेचे  प्रमाण  नियंत्रणात राहण्यास मदत होते. 


कच्च्या केळ्याचं काय कराल ? 


कच्च्या केळ्यापासून भाजी आणि भजी दोन्ही केली जाऊ शकते. कच्च्या केळ्याला चिरून चमचाभर तेलावर फोडणीवर परतवून घ्या. चपाती, फुलक्यांसोबत केळ्याची गरम भाजी अत्यंत चविष्ट लागते.  भाजी प्रमाणेच केळ्याच्या चकत्या बेसन, रवा, तांदूळ, मीठ, हळद, मसाला या पीठाच्या मिश्रणात मिसळा. तेलावर शॅलो फ्राय करा.