मुंबई : जेवल्यानंतर अनेकांना बडीशेप आणि धनाडाळ खाण्याची सवय असते. यामुळे पचन सुधारायला मदत होते सोबतच तोंडाला येणारी दुर्गंधीदेखील कमी होते. मात्र बडीशेप खाणं जितकं फायदेशीर आहे तितकेच बडीशेपाचे पाणीदेखील आरोग्याला फायदेशीर आहे. बडीशेप भिजत ठेवून त्याचं पाणी पिणं आरोग्याला फायदेशीर आहे. पहा बडीशेपाचं पाणी प्यायल्याने कोणकोणते फायदे होतात ?  तुम्हाला माहीत आहे का जेवणानंतर पान, बडीशेप का खातात?


बडीशेपाचं पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे -  


लठठपणा कमी होतो 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आजकाल आबालवृद्धांमध्ये लठ्ठपणाची समस्या आढळते. त्यावर डाएट, जीम, योगाच्या मदतीचे बडीशेपाचं पाणी पिणेदेखील फायदेशीर ठरू शकते. नियमित सकाळी ग्लासभर बडीशेपाच्या पाण्यामध्ये मध मिसळून प्यायल्याने फायदा होतो. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. 


गरोदर स्त्रीयांना फायदेशीर 


गरोदर स्त्रीयांसाठी बडीशेप फायदेशीर आहे. बडीशेप आणि खडीसाखरेचे मिश्रण नियमित सकाळ संध्याकाळ खाणं उपयुक्त ठरते. या मिश्रणामुळे गर्भाच्या शरीरात वाढणारे रक्तही शुद्ध राहते. 


पचनाचा त्रास 


बडीशेप पचन सुधारण्यास मदत करते. बडीशेपाचे पाणी प्यायल्याने पोटदुखी, बद्धकोष्ठता,पोटाचे, पचनाचे विकार दूर ठेवण्यास मदत होते.