तुम्हाला माहीत आहे का जेवणानंतर पान, बडीशेप का खातात?

चांगल्या आरोग्यासाठी खाल्लेले जेवणाचे योग्य रितीने पचन होणे गरजेचे असते. जर पाचनक्रियेत बिघाड झाला तर त्याचा परिणाम शरीर स्वास्थावर होतो. यामुळे अॅसिडीटी, पोटात गॅस धरणे, अपचन आदी समस्या होतात. जेवणानंतर काही गोष्टी खाल्ल्यास पचनसाठी उपयोगी ठरतात. त्यासोबतच माऊथ फ्रेशनर म्हणूनही या पदार्थांचा वापर होतो. 

Updated: Dec 18, 2015, 02:54 PM IST
तुम्हाला माहीत आहे का जेवणानंतर पान, बडीशेप का खातात? title=

नवी दिल्ली : चांगल्या आरोग्यासाठी खाल्लेले जेवणाचे योग्य रितीने पचन होणे गरजेचे असते. जर पाचनक्रियेत बिघाड झाला तर त्याचा परिणाम शरीर स्वास्थावर होतो. यामुळे अॅसिडीटी, पोटात गॅस धरणे, अपचन आदी समस्या होतात. जेवणानंतर काही गोष्टी खाल्ल्यास पचनसाठी उपयोगी ठरतात. त्यासोबतच माऊथ फ्रेशनर म्हणूनही या पदार्थांचा वापर होतो. 

एक कप पाण्यात बडिशेप, वेलची, आलं आणि एक चिमूट हिंग व्यवस्थित मिसळा. पोटातील गॅसपासून सुटका होण्यासाठी जेवणानंतर आल्याचा तुकडा चघळण्यास विसरु नका

बद्धकोष्ठता झाल्यास बडिशेपचे सेवन करा. बडिशेप यात मोठी फायदेशीर आहे. 

तोंडाला वास येत असल्यास वेलचीचा वापर करा. तोडांची दुर्गंधी घालवण्यासाठी वेलची उपयुक्त ठरते. तसेच पुदिनायुक्त पान खाल्ल्यानेही तोंडाची दुर्गंधी कमी होते. 

कफाचा त्रास असल्याच आलं घातलेल्या चहाचे सेवन करा. घशात खवखव आणि कफाचा त्रास यावर आलेयुक्त चहा उपयोगी ठरतो. 

जेवणानंतर जे पान खाल्ले जाते ते अनेक आजारांचा नाश करते. पानांत अनेक अँटिसेप्टिक गुण असतात. 

श्वासात दुर्गंधी येत असेल पान उपयोगी ठरते. यासोबत पानांत लवंग, बडिशेप, वेलची आणि विभिन्न मसाले असल्यास याचा माऊथ फ्रेशनरही म्हणूनही उपयुक्त ठरु शकते. 

रिकाम्या पोटी बडिशेप खाल्ल्याने रक्त शुद्ध होण्यास तसेच त्वचेत चमक येते. जर तोंडाला दुर्गंध येत असेल तर नियमितपणे दिवसातून तीन ते चार वेळा अर्धा चमचा बडिेशेप खा. 

हिरड्यांना सूज अथवा रक्त येत असेल तर खायच्या पानांना पाण्यात उकळून स्मॅश करा. यांना हिरड्यांवर लावल्यास रक्त येणे बंद होते. 

बद्धकोष्ठतेमध्येही पानांचा वापर होतो. पानांसोबत फ्लॅक्सीड, त्रिफळा आणि लिंबू रसाचे सेवन बद्धकोष्ठतेवर उपयुक्त आहे. 

बडिशेपमध्ये कॅल्शियम, सोडियम, आर्यन आणि पोटॅशियम सारख्या खनिजांचा भरणा असतो. यामुळे स्मरणशक्ती वाढवण्यास बडिशेप फायदेशीर ठरते.