मुंबई : आलं-लसूणच्या पेस्टशिवाय अनेकांचं जेवणच तयार होत नाही. काही पदार्थांची लज्जत तर लसणाच्या फोडणीमुळेच वाढते. पण तुम्हांला ठाऊक आहे का? लसणाच्या चहाने दिवसाची सुरूवात केल्यास अनेक आजारांपासून तुमची सुटका होऊ शकते? लसणामधील औषधी गुणधर्म शरीरासाठी आरोग्यदायी ठरते. म्हणूनच तुमच्याही दिवसाची सुरूवात 'हेल्दी' नोटवर करायची असेल तर या चहाच्या मदतीने तुम्ही नक्कीच काही गंभीर समस्यांना दूर ठेवण्यास मदत करू शकतात. 


लसणाच्या चहा / काढा कसा बनवाल ?


साहित्य- 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लसणाची  कळी - 1  
पाणी - 2 ग्लास 
मध- चमचाभर 
लिंबाचा रस - चमचाभर 
आलं - लहानसा तुकडा  


कसा बनवाल चहा ? 


दोन ग्लास पाणी उकळत ठेवा. यामध्ये आलं - लसणाची पेस्ट मिसळा. हे पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये चमचाभर लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर मध मिसळून हा काढा / चहा पिण्यासाठी तयार ...  चहा सेवनाबाबातचे तुमच्या मनातील हे'4' आजच दूर करा 


लसणाच्या चहाचे फायदे - 


#1 दिवसाची सुरूवात या लसणाच्या काढ्याने करणं फयादेशीर आहे. रिकाम्या पोटी हा काढा घेतल्यास शरीराचे मेटॅबॉलिझम सुधारते. पचन संस्थेचे कार्य सुधारते.  


#2 हृद्यविकाराचा धोका  आजकाल आबलवृद्धांमध्ये कोणालाही होऊ शकते. अशावेळेस हृद्यविकाराचा धोका कमी करण्यासाठी हृद्यविकाराच्या रूग्णांसाठी तो अधिक फायदेशीर ठरतो. हृद्यविकाराचा धोका कमी करण्यासाठी सोबतच शरीरात रक्त प्रवाह सुधारण्यासाठी लसूण फायदेशीर ठरते.  


#3 लठ्ठपणाचा धोका कमी करण्यासाठी नियमित सकाळी चहा पिणं आरोग्यदायी आहे. मात्र दिवसाची सुरूवात लसणाच्या चहाने करा. यामुळे शरीरातील फॅट्स कमी होण्यास मदत होते. सोबतच शरीराची इम्युनिटी पॉवर सुधारते.