health benefits vegetable peels News in Marathi : अनेकदा आपण भाज्या आणि फळे खाताना साली टाकून देतो. पण या सालीमध्ये असलेले औषधी गुणधर्म तुम्हाला कळल्यास पुढच्या वेळी नक्कीच भाज्यांची किंवा फळांची साल काढण्यापूर्वी विचार कराल. जगभरातील विविध देशांमध्ये फळे आणि भाज्यांच्या साली या नैराश्यपासून मधुमेहच्या समस्येवर गुणकारी ठरत असल्याचे दिसून आले आहे. इतकंच नाही तर त्वचा मऊ, डागमुक्त आणि चमकदार ठेवण्यातही ते महत्त्वाची भूमिका बजावते.  


भोपळा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भोपळा हा अनेकांच्या घरातला आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. पण तुम्हाला माहित आहे का? भोपळ्याची साल खाल्ल्याने त्वचेला होणारे फ्री रॅडिकल्सचे नुकसान टाळू शकता. यामध्ये बीटा कॅरोटीन आणि झिंक देखील आढळतात, ज्यामुळे तुमची शारीरिक क्षमता मजबूत होते. इतकेच नाही तर ते त्वचेचे अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून संरक्षण करते.


दुधीभोपळा


दुधीभोपळाची सालही गुणांची खाण समजली जाते. यामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. टॅलोन आणि काही मसाले घालून तुम्ही ते एअर फ्रायरमध्ये खाऊ शकता.


बटाटा


बटाटा हा सगळ्यांनाच आवडता पदार्थ आहे. जर तुम्ही भाजी बनवताना बटाट्याची साल फेकून देत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. कारण बटाट्यामध्ये व्हिटॅमिन बी, फायबर, लोह आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळते.


रताळे


रताळेमध्ये व्हिटॅमिन ए असते जे तुमच्या दृष्टीसाठी चांगले असते. व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि लोह देखील त्यात आढळते. म्हणूनच त्याची साल फेकू नका. रताळे हे सालीसकट खाल्ल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढू शकते. 


काकडी


प्रत्येक सॅलडमध्ये वापरल्या जाणार्‍या काकडीत पोटॅशियम, व्हिटॅमिन के आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. हे वजन कमी करण्यासाठी देखील चांगले मानले जाते.


बीट 


बीटमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत. बीटमध्ये बी 9, पोटॅशियम, लोह आणि जीवनसत्त्वे यांसारखे तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. हे रक्त प्रवाह आणि रक्तदाब सुधारण्यास मदत करते. बिटाची सालही खूप निरोगी आहे. त्यात पचन सुधारणारे पदार्थ असतात. त्यामुळे त्याची साल काढू नका. 


गाजर


गाजरांमध्ये बीटा-कॅरोटीन, तंतुमय पदार्थ, व्हिटॅमिन के, पोटॅशियम आणि विविध प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. गाजर खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. पण जर तुम्ही त्याची साल काढली तर तुम्हाला त्याचे आरोग्यदायी फायदे होणार नाहीत. 


काकडी 


काकडीच्या बिया आणि साल अतिशय पौष्टिक असतात. काकडच्या सालीत अनेक रोगांशी लढण्यासाठी अँटिऑक्सिडंट्स आणि एन्झाईम्स असतात. म्हणून, काकडीतील सर्व पोषक गुणांचा फायदा हवा असेल तर साल न काढता ती धुवून खावी. काकडी मधुमेह टाळण्यास मदत करते. डॉक्टर नेहमी काकडी खाण्याचा सल्ला देतात कारण ते शरीरातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. 


पडवळ 


पडवळ ही A, B1, B2 या महत्त्वाच्या घटकांनी समृद्ध असलेली भाजी आहे. यामध्ये कॅलरीज अत्यंत कमी असतात आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते. पडवळाच्या सालीत मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतात.