Diabetes Control Tips: सकाळी सकाळी करा हे काम, दिवसभर शुगर लेव्हल राहिल नियंत्रणात
सकाळी चालणे, एरोबिक डान्स, सायकल चालवणे यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
मुंबई : मधुमेह हा अचानक झालेला आजार नाही, तो हळूहळू शरीरात प्रवेश करतो, म्हणून त्याला सायलेंट किलर म्हणतात. त्याला पूर्णपणे विकसित होण्यापूर्वी काही लक्षणं देखील दिसू लागतात. मधुमेहाची लक्षणे काळजीपूर्वक पाहिल्यास त्यावर नियंत्रण ठेवता येते. तुम्हाला औषध घ्यावे लागणार नाही, तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनशैलीने आणि आहाराने साखर नियंत्रित करू शकता. केवळ आहारात बदल करून रक्तातील साखर कमी होणार नाही, परंतु तुम्हाला सकाळी थोडा व्यायाम करावा लागेल जेणेकरून तुमची साखरेची पातळी नियंत्रित राहील. (Blood Sugar level controls with exercise)
जर तुम्ही तुमचा आहार बदलून आणि औषधे घेऊन पण रक्तातील साखर नियंत्रणात येत नसेल तर आम्ही तुम्हाला व्यायामाचा सल्ला देतो, रोज सकाळी स्वतःसाठी थोडा वेळ काढा आणि या आजाराला निरोप द्या. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त सकाळी व्यायाम करता, त्याचा प्रभाव जास्त असतो. संतुलित आहार आणि व्यायामामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी मॉर्निंग वॉक
तुम्ही चालण्याचे अनेक फायदे ऐकले असतील, पण डायबिटीजच्या रुग्णांना सकाळी चालण्याचे इतके फायदे होतात, हे कदाचित फार कमी लोकांना माहीत असेल. हे केवळ रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करत नाही तर मधुमेहामुळे होणारे इतर रोग देखील टाळते. दुसरीकडे, जर तुम्ही प्री-डायबेटिक असाल, तर वेगाने चालणे देखील हा आजार होण्यापासून रोखू शकते. जर तुम्ही सकाळी किमान 15-20 मिनिटे चालत असाल तर तुम्हाला फायदा होईल.
सायकलिंगचे फायदे
सकाळी सायकलिंग करा, किमान 15 मिनिटे सायकल चालवल्याने तुमची साखरेची पातळी नियंत्रणात राहते. यामुळे केवळ शुगर लेव्हलच नाही तर इतर अनेक आजार बरे होतात.
एरोबिक्स करा
सकाळी एरोबिक्स केल्याने मधुमेहही बरा होतो. दररोज सकाळी किमान 30 मिनिटे एरोबिक नृत्य करा आणि आठवड्यातून किमान पाच दिवस करा. हळूहळू तुमचे शरीर इन्सुलिनचा योग्य वापर करू लागेल.
प्राणायाम
10-15 मिनिटे कपाल भारती आणि अनुलोम विलोम सारखे प्राणायाम केल्याने श्वासोच्छवासाचा व्यायाम होतो आणि तुमचा मधुमेह बरा होतो. मधुमेहाच्या रुग्णांसाठी स्ट्रेंथ ट्रेनिंग, पोहणे हे देखील खूप उपयुक्त आहे