Surgery for Diabetes : मधुमेही अर्थात डायबेटीस (Diabetes) रुग्णांना अनेक पथ्य पाळावी लागतात. खाण्या-पिण्यावर निर्बंधांसह अनेक आजारांना तोंड द्यावं लागतं. सोबतच इन्सुलिनचं (Insulin) इंजेक्शन किंवा शुगर कंट्रोल करणाऱ्या टॅबलेट्स (Sugar Control Tablets) रोज घ्यावी लागतात. मात्र आता डायबेटीसपासून कायमची मुक्तता मिळू शकते. मधुमेहाचा अतिशय जास्त त्रास असलेल्या एका महिला रुग्णावर मुंबईत शस्त्रक्रिया (Operation) करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे त्यांचं इन्सुलिन बंद करण्यात आलं. शिवाय सध्या त्या दिवसातून एकच गोळी खातायत, त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी ही 100 ते 200 च्या मध्ये आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डायबेटीस शस्त्रक्रियेचे फायदे काय आहेत
डायबेटीससाठीची शस्त्रक्रिया ही जास्त चिरफाड न करता केली जाणारी शस्त्रक्रिया आहे. या शस्त्रक्रियेमुळे इन्शुलिनला निर्माण होणारा अडथळा कमी होण्यास मदत होते. शस्त्रक्रियेनंतर शरीरातील इन्सुलिन निर्मिती मूळ पदावर येते ज्यामुळे खाल्ल्यानंतरही रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते  27.5 kg/m2 पेक्षा जास्त BMI असलेल्या, डायबेटीस नियंत्रणात नसलेल्या आशियाई रुग्णांना या शस्त्रक्रियेचा उपाय सुचवण्यात आलाय.


तसंच या शस्त्रक्रियेमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात येते आणि डायबेटीससाठीच्या औषधांपासून मुक्ती मिळते. विशेष म्हणजे रुग्णाचं आयुर्मान 5 ते 9 वर्षांनी वाढण्यास मदत होते. त्यामुळे आता ब्रेन स्ट्रोक, मूत्रपिंडे निकामी होणे, डोळ्यांच्या समस्या उद्भवणं, हृदय विकार यासारख्या डायबेटीसमुळे निर्माण होणाऱ्या आजारांवर मात करणं शक्य होणार आहे. 


शस्त्रक्रियेनंतर साखर नियंत्रणात
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार शस्त्रक्रियेनंतर 80 टक्के मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवण्यास मदत झाली आहे. काही रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर औषधांची गरजही भासलेली नाही. अभ्यासानुसार शस्त्रक्रियेच्या दहा वर्षानंतर 36 टक्के रुग्णांना शस्त्रक्रियेमुळे औषधांशिवाय साखरेच्या पातळीवर नियंत्रण मिळवणं शक्य होणार आहे.