Baby Care Tips : प्रत्येक आई वडिलांसाठी त्यांचं चिमुकलं बाळ जेव्हा हळू हळू मोठं होतं असतं तेव्हा त्याला काय खायला द्यावं याबद्दल त्यांना कुतूहल असतं. डॉक्टर सांगतात एक वर्षांपर्यंत बाळा साखर आणि मीठ देऊ नयेत. बाळा साखर आणि मिठाशिवाय खाणं देणं कितपत योग आहे. कारण सहा महिन्याच्या बाळाला भाजीचे सूप, डाळ पाणी, तांदळाचे पाणी द्यायला सुरुवात करतात. तेव्हा त्यात मीठ घ्यायचं नाही का? चिमुकल्याला मीठ दिलं नाही तर त्याला सोडियम कसं मिळेल? असा प्रश्न पालकांना पडतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण एक वर्षांपर्यंत लहान बाळा मीठ आणि सारख देऊन नयेत नाही तर त्यांना गंभीर आजार होण्याची भीती असते. डॉक्टर आणि बालरोग तज्ज्ञांनुसार खरंतर एक वर्षापर्यंतच्या मुलांची पचनसंस्था पूर्णपणे विकसित झालेली नसते. त्यामुळे त्यांना फक्त द्रव पदार्थ खायला घ्यायला सांगतात. पण मीठ आणि साखर याचं सेवन केल्याने चिमुकल्यांचा किडनी, दात आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. (health news Do not give sugar and salt to baby untill he turns one to prevent from high bp and kidney diseases)


लहान मुलांसाठी किती मीठ गरजेचं आहे?


खरं तर आईच्या दुधातून लहान मुलांची मीठाची गरज पूर्ण होणार आहे. 6 महिने ते एक वर्ष वयोगटातील मुलांना दिवसाला एक ग्रॅमपेक्षा जास्त मीठ देऊ नयेत, असं तज्ज्ञ सांगतात. तर एक ते तीन वर्षे वयोगटातील मुलांना दिवसातून दोन ग्रॅम मीठाची गरज असते. 4 ते 6 वर्षे वयोगटातील मुलांना दिवसाला 3 ग्रॅम मीठापेक्षा जास्त देऊ नयेत. 


साखर किती प्रमाणात द्यावी?


लहान मुलांनाही साखरेचा अतिरिक्त आहार कधीही देऊ नयेत, असं तज्ज्ञ सांगतात. मुलांसाठी, नैसर्गिक गोष्टींमधून मिळणारी साखर ही पुरेशी असते. शिवाय त्यांना फळं आणि इतर पदार्थांमधून नैसर्गिक साखर मिळते, ती चिमुकल्यांसाठी पुरेशी असते. तर तान्हुल्यांना 8 महिन्यापर्यंत मध किंवा खजुराचं सरबत चुकूनही देऊ नका. 


कुठल्या आजारांचा असतो धोका?


हाडं ठिसूळ होण्याचा धोका


जास्त प्रमाणात मीठ अन्नातून दिल्यास मुलांच्या हाडांसाठी धोकादायक असतं. यामुळे शरीरात कॅल्शियमची कमतरता होऊ शकते. शरीरात पुरेसे कॅल्शियम नसल्यास हाडे कमकुवत होऊ शकतात.


डीहायड्रेशनचा धोका


ज्या बालकांच्या आहारात सोडियमचं प्रमाण जास्त असतं त्या मुलांना डिहायड्रेशनचा त्रास होतो. लहान मुलं बोलू शकतं नाही त्यामुळे त्यांना तहान लागलेली आपण्यास कळतं नाही. अशावेळी हे बाळासाठी धोकादायक होऊ शकतं. 


किडनी स्टोनची समस्या


शरीरात पाण्याची कमतरता असल्यास मुलांमध्ये किडनी स्टोन, शरीर दुखणं, बद्धकोष्ठता आणि यकृत खराब होण्याची भीती असते. 


उच्च रक्तदाब/ हाय बीपीचा त्रास


हो जर लहान मुलांच्या आहारात जास्त मीठ असल्यास त्यांच्या रक्तातील बीपीची पातळी वाढते आणि त्यामुळे हायपरटेन्शनची समस्या निर्माण होते. ही समस्या हृदयासाठी अत्यंत हानिकारक असते. 


जर तुम्ही लहान मुलांना आवश्यकतेपेक्षा जास्त मीठ किंवा साखर दिल्यास त्यांना अनेक शारीरिक परिस्थितींना सामोरं जावं लागू शकतं. यामध्ये लठ्ठपणा, दात गळणे आणि मधुमेह आजाराची भीती उद्ध्भवते. 



बाळाला साखर का देऊ नये?


साखर अनेक रासायनिक प्रक्रियांद्वारे शुद्ध केली जातं, जी मुलांसाठी हानिकारक असू शकते. जास्त साखरेमुळे मुलांना क्षय आणि दात किडणे या सारखा समस्या होऊ शकतात. जास्त साखरेमुळे रोगप्रतिकार शक्ती सुद्धा मुलांची कमी होते. संशोधनात असं दिसून आलं आहे की, जास्त साखरेचा आहार घेतलेली मुलांना हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी मधुमेह आणि लठ्ठपणाची आजार दिसून आली आहे.


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)